24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात साकारणार सेंद्रिय बाजारपेठ निर्मिती केंद्र;जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

जिल्ह्यात साकारणार सेंद्रिय बाजारपेठ निर्मिती केंद्र;जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

0
49

गोंदिया,दि.३० नोव्हेंबर : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ग्रामीण पातळीवर रोजगाराच्या संधी व साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने विश्वमूर्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने ग्रामोत्थानासाठी वरदान हे  ब्रिद वाक्य घेऊन सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाद्वारे दुग्ध उत्पादक व सेंद्रिय बाजारपेठ निर्मिती प्रकल्प ही संकल्पना डॉ. प्रशांत कटरे यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडली. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी काल (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, उपायुक्त पशुसंवर्धन, उपमुकाअ. पंचायत, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा कृषी विकास अधिकारी या प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रकल्पावर बैठक घेतली. या बैठकीत हे प्रकल्प कसे साकार होईल व ग्रामीण भागातील बेरोजगार व शेतकर्‍यांच्या समस्या कशा मार्गी लागतील, यावर चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या बाबी, पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिले. यामुळे  जिल्ह्यात  सेंद्रिय बाजारपेठ निर्मिती केंद्र निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील मजुरांचे होणारे स्थलांतरण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या या प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराची साधने उपलब्ध नसने हे असून ग्रामीण विकासासाठी हा मुख्य अडथळा आहे. ग्रामीण भागात नैसर्गिक साधने मुबलक प्रमाणात आहेत. परंतु त्या साधनांचा ग्रामीण विकासाशी मेळ घालता येऊ शकला नाही. जंगलातून तेंदूपत्ता, लाख गोळा करने, लाकडी व्यवसाय तसेच अनेक पारंपारिक व्यवसायांना अखेरची घरघर लागली आहे. ग्रामीण भागातील अकुशल शेतकरी अथवा शेतमजुरास या योजनेद्वारे कुशल शेतकरी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून शेती पुरक व्यवसाय आर्थिक दृष्ट्या कसे करता येईल, हे या प्रकल्पाचे मुळ उद्देश्य आहे. शेंद्रिय शेतीमाल ग्राहक विक्रेत्यांसाठी कसा लाभदायक होईल, असा प्रस्ताव प्रकल्पाचे संयोजक डॉ. प्रशांत कटरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. त्या प्रकल्पाची प्राथमिक दृष्ट्या माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना  जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, उपायुक्त पशुसंवर्धन, उपमुकाअ. पंचायत, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा कृषी विकास अधिकारी तसेच संयोजक डॉ. प्रशात कटरे, प्रशांत बोरकर, शक्ती कटरे, डॉ.  प्रिती कटरे आदींच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या मांडणीवर या सभेत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती यावेळी डॉ. कटरे यांनी विषद केली. तसेच प्रकल्प निर्मितीसाठी शासनाकडे अस्तित्वात असलेल्या योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा साकार करता येईल, यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. तसा अहवाल सादर करून व पुन्हा एकदा प्रकल्प निर्मितीसाठी बैठक बोलावून हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी आयोजित बैठकीत दिला. यामुळे  सेंद्रिय बाजारपेठ निर्मिती केंद्र जिल्ह्यात साकार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगारांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होऊन आर्थिक दृष्ट्याही हा प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याची चर्चा अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.