अर्जुनी मोर.दि.01 :- अर्जुनी मोर तालुकास्तरीय संविधान दिन कार्यक्रम आज 1 डिसेंबरला दु. 12 वाजता आयोजीत करण्यात आला आहे. जि.प. कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर. च्या प्रांगणात तालुकास्तरीय संविधान दिन समारोह समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे संविधान तज्ञ अॅड.दिलीप काकडे राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ आंबेकरी विचारवंत डाॅ.प्रदिप आगलावे,साहित्यिक अॅड.एल.के.मडावी,सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर,संजय मगर,डाॅ. अरविंद अकिनवार,प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुकास्तरीय संविधान दिन समारोह समितीने केले आहे.




