चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

0
17

चंद्रपूर,दि.30 : २०२१ मध्ये होवू घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली जावी व त्याप्रमाणे शासनाने ओबीसींच्या अनेक योजनांसाठी तरतूद करावी. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले, ते पूर्ण करण्यात यावे व ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची व्याप्ती वाढवून ओबीसींना शेती बरोबरच व्यवसायभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे व ओबीसींची आर्थिक उन्नती कशी होईल, यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवाव्यात, यासाठी आम्ही ओबीसींच्या वतीने सतत पाठपुरावा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकारिणीच्या स्थानिक विश्रामगृहात झालेल्या बैठकप्रसंगी निवेदन स्वीकारतांना दिले.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे होते तर चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा अर्जुन भोयर, सावली जिल्हा महामंत्री राकेश बदकी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन ढोमणे, गोंडपिपरी तसेच चंद्रपूर महानगर ओबीसी मोर्चा महामंत्री शशीकांत मस्के, तालुकाध्यक्ष चिमूर एकनाथ थुटे, तालुकाध्यक्ष सावली तुळशीराम कुनघाडकर, तालुकाध्यक्ष, कोरपना वासुदेव आवारी, तालुकाध्यक्ष गोंडपिपरी निलेश पुलगमकार, प्रा. यशवंत आंबोरकर, भास्कर लांजेवार पाहुणे म्हणून उपस्थित होते.