जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी

0
12

गोंदिया,दि..३१ः मागील चार-पाच दिवसांपासून थंडी जोमात सुरू झाली आहे. विदर्भात सर्वाधिक थंडीची नोंद नागपूरमध्ये ५.०१ तर गोंदियामध्ये ५.०२ डि.से. नोंद झाली
असतांना अद्यापही ही थंडीचा जोर कायम आहे. या थंडीने जिल्ह्यात पहिला बळी गेला रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत २९ डिसेंबर रोजी सावलराम नागोजी डोये (४५) रा. करंजी
यांचा थंडीने मृत्यू झाल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. अद्यापही जिल्ह्याचा तापमान किमान ५.८ पर्यंत आहे. तर कमाल तापमान २४. डिग्री. सेल्स. पर्यंत आहे. थंडीचा जोर काम असल्याने सायंकाळपासूनच जिल्ह्यात शेकोटीचा आधार घेतला जात आहे. थंडीने लगतचा भंडारा जिल्ह्यातील चौघाचा बळी गेला असतांनाच आता जिल्ह्यातही थंडीने पहिला बळी घेतला. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील करंजी येथील सावलराम डोये यांचा मृत्यू थंडीने तसेच वेळेवर अन्न व पाणी न मिळाल्याने झाल्याचे सांगितले आहे.