माजी खासदार चुन्नीलाल ठाकूर यांचे निधन

0
21

गोंदिया,दि.31ः भंडारा लोकसभा मतदारसंघाचे  माजी खासदार,गोरेगाव  क्षेत्राचे आमदार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक चुन्नीलाल भाऊ ठाकुर यांचे आज(दि.31) पहाटे 3 वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते.त्यांच्यावर गोरेगाव तालुक्यातील सटवा या त्यांच्या गावी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सन 1970 पासून सटवा येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदापासून त्यांनी आपल्या राजकिय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आॅप. बँकेचे संचालक, सचिव व उपाध्यक्ष पद भूषविले. सतत 30 वर्षापासून ते बॅंकेच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यानंतर सन 1990 मध्ये त्यांनी गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने निवडणूक लढवून श्रीकांत जिजकार यांचा पराभव करीत विजय मिळविला होता.त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, पत्नी व नातवंड असा आप्त परिवार आहे.