रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी नेते यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

0
16

सालेकसा,दि.३१: दुपार पाळीत रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी, सालेकसा-आमगाव तालुक्यातील जनतेच्या बहुप्रतिक्षीत मागणी मार्गी लावण्यात यावी. अशी मागणी गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन व चर्चा केली. नवी दिल्ली येथे रेल्वेचे डीडीपीएस अधिकाèयांची भेट घेऊन चर्चा करुन खा. नेते यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी खा. नेते यांच्यासोबत आमगावचे माजी आ.भेरqसह नागपुरे, घनश्याम अग्रवाल, गडचिरोली येथील जनजाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश गेडाम, महामंत्री रवि ओलावार, डॉ.पवार उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात गोंदिया आणि दुर्ग दरम्यान दुपार पाळीत ये-जा करणारी लोकमल मेमू गाडी सुरु करण्यात यावी.
दुपारच्या वेळेत प्रवाशांना या दोन मोठ्या जंक्शन रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेची कोणतीच सोय नाही. त्यामुळे या दरम्यान व्यापारी, विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. अशात लोकल गाडी तातडीने सुरु करण्याची गरज आहे. या नेते यांनी निवेदनातून आमगाव येथे जनशताब्दी एक्सप्रेस व दरभंगा एक्सप्रेसचा थांबा देण्याची सुद्धा मागणी केली आहे. या आधी सुद्धा रेल्वे मंत्री संबंधित अधिकाèयांना रेल्वेची समस्या सांगितली होती. त्यामुळ्य संबंधित अधिकाèयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आाश्वासन दिले आहे. आता जनतेची अपेक्षा केव्हा पूर्ण होते याची वाट बघावी लागेल.
लोधी समाजाला ओबीसीत सामावून घेण्याकरिता निवेदन
केंद्रातील ओबीसी प्रवर्गाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील लोधी समाजाला सहभागी करुन घेण्यात यावे या मागणीचे निवेदन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांना माजी आमदार भेरqसह नागपुरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी रqवद्र ओलालवार, प्रशांत वाघरे, भारत खटी, रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे व घनश्याम अग्रवाल उपस्थित होते.