पोटगाव ग्रामपंचायतीवर ओबीसी संघटनेचा झेंडा

0
7

गडचिरोली,दि.17- : पोटगाव गट ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदी विनायक हिरामन धारगावे तर उपसरपंचपदी रूपाली गजपुरे या निवडून आल्या आहेत.
सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली. सरपंचपदाकरिता डॉ. प्रेमचंद शेंडे व विनायक धारगावे यांनी नामनिर्देश दाखल केले होते. धारगावे यांना पाच व डॉ. शेंडे यांना चार मते पडली. त्यामुळे धारगावे यांची सरपंचपदावर निवडझाली. रूपाली गिरीधर गावतुरे यांची उपसरपंचपदी अविरोध निवडझाली. या ग्राम पंचायतीत ओबीसी संघटनेच्या वतीने निवडणूक लढविण्यात आली होती. या संघटनेचे नऊ पैकी पाच सदस्य निवडून आले. सदर निवडणूक पं. स. सदस्य शिवाजी राऊत, उपसरपंच नरेंद्र गजपुरे, क्षीरसागर शेंडे, लन्हाजी वाढई, रूमदेव कुकुडकार, दोनाडकर, प्रमोद नाकाडे, किरण बन्सोड, केवळराम दुधकुवर, गणपत मेo्राम, मधुकर दामले, सुरेद्र दोनाडकर, मोरेश्‍वर गजपुरे, हिलाल नाकाडे यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आली. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर गावातून विजयी रॅली काढण्यात आली.