बाबासाहेबांचे जीवन प्रेरणादायी-खासदार पटोले

0
8

तुमसर ,दि.17 : शोषीत, पीडित, दलित आदिवासी, ओबीसी समाजाच्या उत्थानाकरिता जीवनभर संघर्ष करुन न्याय मिळवून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा वसा निरंतर टिकवून ठेवणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील पंचायत समिती कार्यलयाच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पूतळयाचे अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी येत्या काळात भंडारा जिल्हयामध्ये वैनगंगा फेस्टीवल आयोजन करण्याची घोषणा त्यांनी केली.
अध्यक्षस्थानी आ. चरण वाघमारे, तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप टाले, डॉ. उल्हास बुराडे, राजेश पटले, उपविभागीय अधिकारी सोनुने, पोलिस निरीक्षक किशोर गवई, नायब तहसिलदार अरविंद हिंगे, उप खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर उपस्थित होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, बाबासाहेबांचे विचार व कार्यतळागळापर्यंत पोहचविण्याची खरी गरज असून पंचायत समितीमधील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा येथील कर्मचारी व नागरिकांना प्रेरणादायी ठरणार आहे. येथील कर्मचारी यापुढे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडता कामा नये. दररोज बाबासाहेबांचे दर्शन त्यांना होणार असल्याने त्यांचा त्याग, त्यांची प्रेरणा त्यांना आठवण करुन देणार आहे.
प्रास्ताविक सभापती कलाम शेख, संचालन राहुल डोंगरे, आभार शिक्षण विस्तार अधिकारी आदमने यांनी मानले. याप्रसंगी पं.स. सदस्य मनोज वासनिक, हिरालाल नागपुरे, बंटी बाणेवार, सहादेव राऊत, आशा अनकर, प्रभा पेंदाम, अजय खंगार, जि.प. सदस्य अशोक उईके, शिवा नागपुरे, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, शिक्षण विस्तार अधिकारी भलावी, सह आंगणवाडी सेविका, शिक्षक शिक्षीका पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.