शेतीला पाणी मिळण्याची स्वप्नपूर्ती-आ.संजय पुराम

0
15

देवरी दि.१9: शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळावे, हे आपले स्वप्न होते. शेतजमीन जलमय करणार, हे गावकर्‍यांना दिलेले वचन आज पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले.पुराडा, मुरपार, ढिवरीनटोला येथे वाघनदीवर उपसा जल सिंचन योजनेचे भूमिपूजन रविवार (दि.१७) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, शेतकर्‍याचा मुलगा असल्याने मला शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण आहे. आमदार झालो ते केवळ सर्वांना समान न्याय देण्यासाठी. सिंचनाच्या माध्यमातून शेतीचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल, याकडे आपण लक्ष देणार आहोत. या योजनेला जवळपास दोन कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन विकास निधीतून ४0 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे व एक वर्षाच्या आत ही योजना पूर्णत्वास जाईल. या योजनेप्रमाणेच विधानसभा क्षेत्रातील शेतींना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणार, असे ते म्हणाले.अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार होते.अतिथी म्हणून विरेंद्र अंजनकर, जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, कामेश्‍वर निकोडे, मुक्ता शहारे, सुकचंद राऊत, लक्ष्मण नाईक, श्रीकृष्ण हुकरे, कमल येरणे, राजकुमार रहांगडाले, सुभाष कापगते, शैलेश कटरे उपस्थित होते.संचालन विनोद भांडारकर यांनी केले. या वेळी पुराडा, मुरपार, ढिवरीनटोला, कारूटोला, देवरी येथील नागरिक व भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.