२६ मे रोजी चंद्रपूर बंदचा इशारा : पुगलियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
8

वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा लांबणीवर
चंद्रपूर दि.१9: या सत्रापासून सुरू होण्याची अपेक्षा असलेले चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा लांबणीवर पडले आहे. मेडीकल कौन्सिलींग ऑफ इंडियाच्या चमूने चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावात मोजून २४ त्रुट्या काढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यात यश न आल्याने हे महाविद्यालय चंद्रपुरात स्थापन होण्याचे चंद्रपूरकरांचे स्वप्न अपुरेच राहणार की काय, अशी शंका वाटायला लागली आहे.
दरम्यान, या प्रकरामुळे चंद्रपूर जिल्हयातील जनता चांगलीच नाराज झाली आहे. काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून हे महावविद्यालय विनाविलंब सुरू करण्याची मागणी केली आहे. यात सात दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास २६ मे रोजी चंद्रपूर बंद पाळण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून याच सत्रात हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात आपल्या कार्यालयात नरेश पुगलिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, एमसीआयने अगदी लहान कारणावरून हे महाविद्यालय चंद्रपुरात येण्यापासून थांबविले आहे. २४ त्रुट्या दाखविताना अगदी नाहक कारणांचा आधार घेण्याचा प्रयत्न करणार्‍या या अधिकार्‍यांची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. या प्रकरणी येत्या सात दिवसात निर्णय झाला नही तर, २६ मे रोजी बंद पाळण्याचा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत नरेश पुगलिया पुढे म्हणाले, २0१४-१५ या सत्रात वैद्यकीय महाविद्याल सुरू न होणे यामागे राजकीय कारण होते. मात्र, या वर्षी तरी ते सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु, १३ जानेवारीला झालेल्या बैठकीत एमसीआयने हे महाविद्यालय नामंजूर केले. ३00 खाटा आणि सर्जरी विभागात ९0 खाटांची आवशक्यता होती. त्यात ६४ आणि २६ खाटा कमी दाखविण्यात आल्या.
वेबसाइट तयार न केल्याचे अगदी क्षुल्लक कारणही दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह नसणे, लेक्चर थियेटर नसणे, केंद्रीय वाचनालय नसणे, १७५ परिचारिकांची गरज असताना केवळ १६४ परिचारिका असणे, इंटरकॉम कार्यरत नसणे, चार ऑपरेशन थियेटरऐवजी तीनच असणे आदी त्रुट्या यात दाखविण्यात आल्या आहेत.
खासगी संस्थांना वैद्यकीय महाविद्याय मंजूर करताना एवढय़ा बारकाईने अहवाल न बनविणारे मेडिकल कौन्सिंल ऑफ इंडियाचे अधिकारी चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्याबद्दल मात्र असंवेदनशिल दिसत आहेत. अगदी लहान कारणावरून अडचणी निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. या त्रुट्या मोठय़ा नसल्याने सहज दूर करता येतील. त्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यायला हवा होता. यामुळे या अधिकार्‍यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.