वेगळ्या विदर्भाशिवाय विकास अशक्य – श्रीनिवास खांदेवाले

0
8

चंद्रपूर दि.१9: : तेलंगणाच्या धर्तीवर वेगळ्या विदर्भाची घोषणा सरकारने तात्काळ करणे गरजेचे आहे. सर्व साधने व प्रशासकीय कार्यालये उपराजधानीत पूर्वीपासूनच आहे.विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भराज्याची गरज असून वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. नांदाफाटा येथे गुरूवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारा आयोजित शेतकरी कामगार व दारुमुक्ती मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार अँड. वामनराव चटप, किशोर पोतनवार उपस्थितीत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे माजी मानद सचिव प्रभाकर दिवे, प्राचार्य अनिल ठाकूरवार, जि.प. समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, पं.स. सभापती रवी गोखरे, रमेश नळे, लटारी ताजने, अरुण नवले, बंडूू राजूरकर, संतोष पावडे, गणपत काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना चटप यांनी भूमी अधिग्रहण कायदा शेतकर्‍यांना मारक असून नवीन सरकार हे उद्योगपतीचे सरकार असल्याचे मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी शेतकरी व कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन तीव्र करण्याची गरज असल्याचेही सांगितले. प्रास्ताविक प्रभाकर दिवे यांनी केले. संचालन दीपक चटप तर आभार अरुण रागीट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मनोहर झाडे, बंडू उरकुडे, राजेश पावडे, शांताराम पानघाटे, गजानन पंधरे, जनार्धन वरपटकर, दादा गिरडकर, गोलू काकडे, सचिन सिडाम, वसंत बोढाले आदींनी परिश्रम घेतले.यावेळी तालुक्यातील शेतकरी, कामगार उपस्थित होते.