नागपुरात होणार पहिली कौशल्य विकास अकादमी स्थापनाच्या विचार -बडोले

0
23

बेरोजगार युवकांना कौशल्य विकास काङ्र्मक्रतून नोकरीची हमी
मंत्री,अधिकारी गारव्यात,तर पालक,युवक उकाड्यात
उकाड्यामुळे मेळाव्याला आलेल्या युवकासंह पालकांचे बेहाल
स्वागतसमारंभाप्रंसगी दिसला नियोजनाचा अभाव
गोंदियात आयोजित कौशल्य विकास मेळाव्यात ७० संस्था सहभागी
गोंदियातही स्पर्धा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस

गोंदिया , दि. 20-मागास बेरोजगार युवकांना कौशल विकासाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था)च्यावतीने आयोजित या शिबिरात आलेल्या प्रत्येकालाच भविष्यात नोकरीची हमी मिळणार आहे.गोंदिया,भंडारा व गडचिरोली जिल्हे हे मागास जिल्हे असल्याने या जिल्ह्यातील युवकांना स्थानिक जिल्ह्यात उपलब्ध असलेला रोजगार कसा मिळवून घेता येईल यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संस्था त्या विद्याथ्र्यांची कौशल्य क्षमता ओळखून प्रशिक्षण देणार असल्याने विद्याथ्र्यांच्या कौशल्य क्षमतेचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सोबतच नागपूर येथे देशातील पहिली कौशल्य विकास अकादमी स्थापन करण्याचा विचार असल्याचेही म्हणाले.
ते मंगळवारी गोंदिया येथील पवार सांस्कृतिक सभागृहात आयोजित सर्व जाती धर्माच्या उमेदवारासाठी आयोजित मोफत कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,बार्टीचे महासंचालक डी.आर.परिहार,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,भरत क्षत्रिय,चित्रलेखा चौधरी,माधव झोड,सुहास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की आपल्या जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना असून इलेक्ट्रानिक क्लस्टरसह डेअरी व भाजीपाला क्लस्टर योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन सुशिक्षित युवक तयार करण्यासंबधी वाटचाल सुरू झाली आहे.तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र देतांना भविष्यात अडचण येऊ नये यासाठी सर्व कागदपत्र व्यवस्थित एकत्रितरीत्या संकलित करून ठेवण्यात येत असल्याचेही म्हणाले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की,आपला जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे,पाहिजे तसे उद्योग आपल्याकडे नाहीत.परंतु जे काही उद्योग आजच्या घडीला जिल्ह्यात आहेत त्यामध्ये सुमारे १५०० च्या जवळपास युवकांना रोजगार मिळू शकतात अशा जागा आहेत.आज आपल्या गोंदियात राज्यातला पहिला कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या प्रेरणेमुळे होऊ शकला आहे.आपण नौकरीचा शोध घेतांन आरामाची नोकरी कशी मिळेल असे बघतो,परंतु आरामाच्या नोकरीत प्रगती नसते.त्यामुळे युवकांना आपल्या कौशल्य विकासाचा योग्य त्या ठिकाणी वापर करावे असे आवाहन केले.तसेच जिल्ह्यात आपण इलेक्टानिक क्लस्टरच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे म्हणाले.
बार्टीचे महासंचालक परिहार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.परिहार यांनी संस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्याथ्र्यांसाठीच योजना राबविण्यात येतात.तर शिल्लक तरतुदीतून खुल्या प्रवर्गातील उमेदवारासांठी प्रशिक्षण राबविले जात असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सुमारे ३ हजाराच्यावर युवकांनी आपली उपस्थिती नोंदवून कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आपल्या नावाची नोंदणी करवून घेतली आहे.

जिल्ह्यासाठी इलेक्ट्रानिक क्लस्टर पर्याय-जिल्हाधिकारी
राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या उत्पन्नापेक्षाही आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीचे उत्पन्न हे कमी आहे.त्यामुळे आपला जिल्हा किती मागास आहे हे दिसून येते.त्यातच धान पिकाशिवाय दुसरे पीक नाही.आणि मोठा उद्योग ही नाही.अशा परिस्थिती जिल्ह्यात दिवसेदिवस सुशिक्षत बेरोजगार युवकांची वाढणारी संख्या लक्षात घेता या सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इलेक्ट्रानिक क्लस्टरशिवाय पर्याय नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.त्यासाठी जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती गोळा करून ती माहिती वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.आणि चांगल्या संस्थांशी जिल्हाप्रशासन करार करून त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे.यात जिल्ह्यातील चांगल्या शिक्षणसंस्थाचा सुध्दा सहकार्य घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.