जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पोलीस, विद्युत व वनविभाग अधिकारी व कर्मचार्यांची कार्यशाळा

0
473

गोंदिया,दि.04ः-जागतिक वन्यजीव दिवसा निमित्त बोदलकसा येथे विद्युत तारेने होणा-या शिकारींवर प्रतिबंध घालण्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्हयाचे महाराष्ट्र राज्य विज वितरण  (MSEDCL) कंपनी मर्यादित, पोलिस विभाग व प्रादेशिक वनविभाग, वनविकास महामंडळ (FDCM) व वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे करीता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेस एकुण 50-60 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यशाळेला भंडाराचे कार्यकारी अभियंता(विज वितरण कंपनी)शैलेश कुमार,उपकार्यकारी अभियंता आर.डी.गायकवाड,सहा.पोलिस निरीक्षक तुकाराम काटे,SDPO साकोली,पोलीस निरिक्षक पी.वाय.मंडलवार व वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मानद वन्यजीव रक्षक राजकुमार जोब उपस्थित होते.

सदर कार्यशाळेला Wildlife Protection Society of India (WPSI) मध्य भारताचे संचालक नितीन देसाई यांनी विद्युतीकरणाने होणा-या शिकारी बाबत उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर तिन्ही विभागाव्दारे विद्युतीकरणाने होणा-या शिकारी बाबत आळा घालण्याकरीता समन्वय कसा साधता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली.वन्यजीव संवर्धनाचे धोरणाबाबत विभागीय वन अधिकारी(वन्यजिव) उत्तम सावंत,नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विद्युतीकरणामुळे होणारे मृत्यू व शिकारी टाळण्याकरीता घेण्यात येणा-या उपाययोजनेबाबत सहाय्यक नवसंरक्षक प्रदीप पाटील यांनी सादरीकरण केले.नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राते वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रामानुजम यांनी विद्युतीकरणाने होणा-या शिकारी बाबत आळा घालण्याकरीता उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.तसेच तिन्ही विभागांना नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात विद्युतीकरणाव्दारे शिकारी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत तसेच तिन्ही विभागांना समन्वय साधण्याकरीता आवाहन केले. उपसंचालक कु. पूनम पाटे यांनी  उपस्थित सर्वाचे आभार मानले.

  • पिटेझरी येथे निसर्ग मार्गदर्शकांकरीता (Guide) वन वाचनालयाचे उदघाटन

दरम्यान नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राते वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रामानुजम यांचे हस्ते पिटेझरी येथे निसर्ग मार्गदर्शकांकरीता पिटेझरी प्रवेशव्दारावर वन वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीच्या उपसंचालक कु. पूनम पाटे,विभागीय वन अधिकारी(वन्यजिव)उत्तम सावंत,सहाय्यक वनसरंक्षक रुपाली सावंत,पिटेझरीचे वनपरिक्षेत्राधिकारी सदाशिव अवगान तसेच पिटेझरीचे कर्मचारी व निसर्ग मार्गदर्शक उपस्थित होते.या प्रसंगी निसर्ग मार्गदर्शकांसाठी पक्षी ओळख मार्गदर्शिकेचंही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

  • वन्यजीव सप्ताह 2019 च्या विजेत्यांसाठी निसर्ग संवेदन शिबीर

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया मार्फत वन्यजीव सप्ताह 2019 च्या स्पर्धेतील विजेत्यां विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचेकरीता एक दिवसीय निसर्ग संवेदन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर नागझिरा अभयारण्यात आयोजित करुन त्यांना वन्यजीव विभागामार्फत वन्यजीव संरक्षण आणि व्यवस्थापनाबाबत करण्यात येणा-या कामांबाबत आणि वन्यप्राण्यांबाबत जलंगल सफारी दरम्यान माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेस मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे,हिरवळ संस्थेचे रुपेश निंबार्ते व प्रतिक पुराणिक यांनी मार्गदर्शन केले.