रेल्वे स्थानकाच्या विकासाला प्रारंभ

0
11

भंडारा,दि.६- भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या विकास कामाकरिता एक कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर विकास कामाची सुरूवात खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील पंचवार्षिक वर्षाच्या आत सदर कामे पुर्णत्वास येतील, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
भंडारा रोड रेल्वे स्टेशन १८८२ पासून अस्तित्वात आहे. दररोज ५ हजार प्रवासी प्रवास करीत असून १३ कोटी ९८ लक्ष रूपये वार्षिक उत्पन्न रेल्वे विभागाला भंडारा रोड रेल्वे स्टेशन पासून मिळतो. वार्षिक उत्पन्न व प्रवाशाची संख्या लक्षात घेतल्यास सदर रेल्वे स्टेशन सुविधाच्या तुलनेत उपेक्षित होते.
प्रवाशाची सुरक्षा वार्‍यावर होती. दोन्ही प्लेटफार्मवर प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशाचे बेहाल होत होते. प्लेटफार्म ठिकठिकाणी उखडलेले होते. प्रवाशांना शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. सीसीटी कॅमेरे यासह रेल्वे गाडची अचूक माहिती दर्शविणारी यंत्रणा धुळखात होती. रेल्वे स्टेशनची इमारत रंग रंगोटी नसल्यामुळे भंगार वाटत होती.
यावेळी डी.आर.एम. आलोक कन्सल, डी.सी.एम. एन्मय, मुख्याध्यापक, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके, सेवक कारेमोरे, रमेश सुपारे, मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, डॉ. उल्हास बुराडे, गजानन झंझाड, रवि येळणे, एकनाथ फेंडर, सुरजभान चव्हाण, थारनोद डाकरे, चांगदेव रघुते, चेतन डांगरे, पुष्पा भुरे, प्रमिला लांजेवार, डी. सिंग, निलम हलमारे उपस्थित होते.