नांदेडजवळ वऱ्हाडी बसला अपघात; 9 ठार

0
19

नांदेड दि.६- नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जण जागीच ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने बसला समोरून दिलेली धडक एवढी भीषण होती, की बसचे छत उडून पडले. या अपघातात 16 जण जखमी असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील नांदेड येथील बरड गावचे रहिवाशी होते. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे होणाऱ्या लग्न समारंभासाठी या बस जात होत्या.