25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ वाघाच्या बछड्याला वनविभागाचे संरक्षण

वाघाच्या बछड्याला वनविभागाचे संरक्षण

0
322

मूल,दि.24: तालुक्यातील सुशी येथे आज शुक्रवारला सकाळी वाघाचा बछडा एका झाडाखाली एका व्यक्तीला आढळून आला.त्याने तात्काळ ही माहिती गावात दिली. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या या गावातील वनविभागाने व वन्यजीवप्रेमी उमेश झिरे यांनी बछड्याला ताब्यात घेत त्याला चंद्रपूर येथे पाठवले आहे. हा बछडा ३ ते ४ महिन्यांचा असून तो अशक्तही आहे. जंगलात फिरत असताना वाट चुकून तो गावाकडे आला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

blank