नागपूर,दि.25ः कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भारतीय रेल्वेगाड्यांच्या डब्ब्यांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहे. यासाठी नागपूर रेल्वे विभागही कोरोनाच्या लढ्याविरुध्द सज्ज झाले असून
विभागात ३५ विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहे.देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. या
पाश्र्वभूमीवर वेंâद्र सरकारने प्राथमिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. सर्व शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालये तसेच अन्य आस्थापनांमध्येही विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत. त्यामध्येही रेल्वेनेही पुढाकार घेऊन रेल्वे डब्ब्यांमध्ये कक्ष निर्माण केले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सुमारे ३५ विलगीकरण कक्ष तयार केले
आहेत. यासाठी नागपूर रेल्वे विभागाला आठ दिवसाचा कालावधी लागला असून १६ बेडची व्यवस्था करण्यात आली
आहे. यात ४५० रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली.





