अर्जुनी मोरगाव,दि.29 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच विषाणू प्रादुभार्वाला प्रतिबंध घालण्यासाठी गावस्तरावर ग्राम पंचायत प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असून खबरदारी घेतली जात आहे. त्यातच सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. या परिस्थितीचा आढावा तसेच सोमवारला आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वार्यामुळे रब्बीधान पिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्याची पाहणी करण्यासाठी क्षेत्राचे आमदारमनोहर चंद्रिकापुरे यांनी केशोरी गावाला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे या सुध्दा उपस्थित होत्या.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत आ.चंद्रिकापुरे यांनी विषाणूंच्या प्रादुभार्वामुळे उपस्थित झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनेचे जनतेने पालन करावे, असे आवाहन केले. दरम्यान परिसरातील समस्या विषयी माहिती दिली. जलसिंचनाची समस्या, परिसरातील दळणवळणाची समस्या, केशोरी येथे बायपास रस्त्याची समस्या, शेतकर्यांची कर्जमाफी, मक्का खरेदीची समस्या, आरोग्य विषयक समस्या आदि विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच आरोग्य विषयक समस्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.पिंकू मंडळ यांच्याशी चर्चा केली. आरोग्य केंद्रातील रिक्त पदांची माहिती घेवून वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकर्यांनी धान्य पिकावर अवलंबून न राहता विविध पिके येथे घेतली पाहिजेत अनेक शेतकर्यांनी एकत्र येऊन शेतीमध्ये काजू सारखे पीक एप्पल बोर सारखी टरबूज, खरबूज आदि पीक घेवून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन केले. नागरिकांनी आमदारांना परिसरातील अनेक समस्या सांगून त्या सोडविण्याची विनंती केली.





