शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

0
7

भंडारा दि.१२:: भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारला घेण्यात आले. या मुलाखतीस सेना कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.
प्रत्येक मतदार संघासाठी १0 ते १२ इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने पक्षाने मुलाखतीदरम्यान निवडून येण्याची क्षमता या निकषावर भर दिला. प्रत्येक उमेदवाराने सर्मथकांसह व केलेल्या आपल्या कार्याचा अहवाल सोबत घेऊन मुलाखती दिल्या. या मुलाखती भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजेंद्र पटले, अजय तुमसरे, प्रशांत लांजेवार, चंदू राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल गायधने, सुनिल कुरंजेकर, हेमंत बांडेबुचे, राजु थोटे, रामसिंग बैस, विजय काटेखाये, हंसराज आगासे, प्रकाश मेश्राम, अरविंद बनकर, प्रकाश पारधी, लेहनदास साठवणे उपस्थित होते.