भंडारा दि. 12 :– जिल्हयात आतापर्यंत 47 हजार 910 नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डॉऊनलोड केले आहे. नागरिकांनी आपल्या ॲन्ड्राईड मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करुन आरोग्य विषयक माहिती अचूक भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून आतापर्यंत आयसोलेशन वार्डमधून 203 व्यक्तींनाडिस्चार्ज देण्यात आला आहे. 10 व्यक्ती आयसोलेशन वार्ड मध्ये भरती आहेत. आतापर्यंत 617 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो), नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी 604व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून एकही व्यक्ती जिल्ह्यात आली नसून 21व्यक्ती रुग्णालय अलगीकरण कक्षात आहेत तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये 22 व्यक्ती असे एकूण 43 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये भरती आहेत. 397 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 29 हजार 285 आहेत. यापैकी 21 हजार 744 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. 7541व्यक्तींना गृह विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत असून वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळून जीवनावश्यक व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





