26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज एक कोरोनामुक्त तर एक रुग्ण पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात आज एक कोरोनामुक्त तर एक रुग्ण पॉझिटिव्ह

25 व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात कोरोना बाधितांची संख्या 42 क्रियाशील रुग्ण 17

0
427

भंडारा दि.8 (जिमाका) जिल्ह्यात आज एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असून एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 25 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आज 8 जून रोजी प्राप्त झाला असून पवनी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर आज एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 42 इतकी असून यामध्ये क्रियाशील रुग्ण 17 आहेत तर 25 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 2394 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत 42 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2248 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 104 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 8 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 28 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 355 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 171 भरती आहेत. 1890 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40710 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 30085 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 10625 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.