गोंदिया,दि.09ः-गोंदिया जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातंर्गत अनेक संस्था काम करीत आहेत.त्या संस्था दरवर्षी आपपल्या सभासदांना वार्षिक आमसभेच्यावेळी भेटवस्तू देण्याचा ठराव पारित करतात.त्यासाठी 3-4 सदस्यीय समिती गठित करण्यात येते.अशाच प्रकार चांगल्या नामाकिंत सहकारी क्षेत्रातील संस्थेतही झालेला आहे.गेल्या काही वर्षापासून तर एका संस्थेच लाखो रुपये वेगळे करण्यात आले,मात्र सभासदांना अजून भेटवस्तू मिळालेल्या नाहीत.त्यातच भर की काय अशाच एका संस्थेमध्ये सर्वपक्षीय सत्ता सध्या सुरु आहे.त्या संस्थेतील सदस्यांना भेटवस्तू देण्याचे ठरविण्यात आले.त्यासाठी 4 संचालकांची एक समिती नेमण्यात आली.त्या समितीने सदस्यासांठी होमथेटर स्वरुपातील भेटवस्तू खरेदी केले ते साहित्य म्हणजे दिल्ली मेड.ज्याची वास्तविक किमंत बाजारात तपासायाल गेलात तर 1000 ते 1500 च्यावर नाही.मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या संचालक समिती सदस्यांनी एका भेटवस्तूची किंमतच 4000 ते 4500 रुपये ठेवत तसे देयकेच तयार करुन घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.ही संस्था जिल्हा परिषद,बांधकाम विभाग,जीवन प्राधीकरण,वनविभागासह इतर शासकीय कार्यालयातील कामासांठी महत्वाची मानली जात असून जिल्हा उपनिबंधक त्या संस्थेचा शोध घेऊन त्या भेटवस्तू खरेदीची निष्पक्ष चौकशी करणार काय असा प्रश्न काही हितचिंतक सदस्यांनी उपस्थित केला आहे.





