27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

·         मुबलक बियाण्यांचा साठा उपलब्ध ·         67 हजार 780 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर ·         32 हजार 680 मेट्रिक टन खतांचा साठा

0
360

भंडारा,दि.08 – खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्हयात भात पिकाचे 1 लाख 94 हजार 398 हेक्टर, तूर पिकाचे 12 हजार 16 हेक्टर व सोयाबीन पिकाचे 550 हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे 33113.05 क्विंटल, तूर पिकाचे 146.8 क्विंटल व सोयाबीन पिकाचे 329.9 बियाणे उपलब्ध झालेले आहे. मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु असून कोणत्याही तालुक्यात बियाणांची टंचाई भासणार नाही, अशी माहिती कृषी विकास अधिकारी यांनी दिली.

शासनाकडून जिल्हयास युरीया खताचे 25 हजार 520 मेट्रिक टन, डिएपी खताचे 3 हजार 500 मेट्रिक टन, एमओपी खताचे 1हजार 360 मेट्रिक टन, इतर संयुक्त खताचे 29 हजार 360 मेट्रिक टन  व एसएसपी खताचे 12 हजार 40 मेट्रिक टन असे एकूण 67 हजार 780 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झालेले असून 2 जून 2020 रोजी जिल्हयात युरीया खताचे 6 हजार 900 मेट्रिक टन,  डिएपी खताचे 650 मेट्रिक टन, एमओपी खताचे 220 मेट्रिक टन व इतर संयुक्त खताचे 14 हजार 280 मेट्रिक टन व एसएसपी खताचे 10 हजार 630 मेट्रिक टन असे एकूण 32 हजार 680  मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे.

खरीप हंगामात जिल्हयास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलबध झाले असून कोणत्याही तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. मोठया शेतकऱ्यांनी शक्य असल्यास आतापासून बि-बियाणे, खते खरेदी करावे जेणेकरुन हंगामात दुकानात गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर ठेवून  सर्वांना आवश्यकतेनुसार बि-बियाणे, खते मिळतील असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी व्हि.जी. पाडवी व मोहिम अधिकारी व्हि.एम. चौधरी यांनी केले आहे.