अर्जुनी मोरगाव,दि.09ःतालुक्यातील तावशी येथील एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी लाकडाची गरज निर्माण झाली.मृताच्या कुटुबियांची आधीच परिस्थितीत हलाखीची,त्यातच संचारबंदी…अशात परिसरातील तरुणांनी पुढे येत अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली.मात्र अग्निसंस्कारासाठी जाळाऊ लाकडे वनविभागाकडे मागण्यात आली.परंतु वनविभागाच्या अधिकारी वनकर्मचार्यांनी लाकडेच नाहीत तर देणार कुठून अशी भूमिका घेतली.त्यामुळे वनविभागाच्या या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी मृतदेह सोबत घेऊनच युवकासंह नातेवाईकांनी अर्जुनी मोरगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले आणि गोंधळ उडला.यानंतर मात्र संवेदना हरपलेल्या वनविभागातील वनपरिक्षेत्राधिकारी दुर्गे यांना शेवटी जाळाऊ लाकडे उपलब्ध करुन देत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करावे लागले.





