25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ विविध कामांची आ.कोरोटे कडून पाहणी

विविध कामांची आ.कोरोटे कडून पाहणी

0
330

चिचगड,दि.14: देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात आ. सहसराम कोरोटे यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधकात्मक उपाययोजना तसेच रोहयो कामाची पाहणी केली.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार उडाला असून अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर ग्रामीण क्षेत्रात परतले आहेत. अशा स्थितीत आपल्या विधानसभा क्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधकात्मक उपाययोजना व मग्रारोहयोतंर्गत कामाची पाहणी आ. कोरोटे यांनी केली व संबंधितांना आवश्यक दिशानिर्देश दिले. चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील कोरोना संबंधित सोयी व उपययोजनाची पाहणी केली. तसेच परिसरात बाहेरुन आलेल्या व बाधित झालेल्यांवर योग्य उपचार व रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सुचना दिल्या. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोंगाडे, डॉ. निशा कापगते, लॅब टेक्निशियन आर. एस. चचाणे, पल्लवी साखरे आदी उपस्थित होते. दरम्यान, अंभोरा येथे सुरु असलेल्या रोहयो कामाला भेट देऊन तेथील काम व मजुरांसाठीच्या सुविधांची पाहणी केली. यावेळी उमेश धानगाये, रोजगार सेवक मोहन घरत, ग्रापं सदस्य शाईन सय्यद, दिलीप परिहार आदी उपस्थित होते.