24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ ई-पास तयार करण्यासाठी मोजावे लागतात पैसे?

ई-पास तयार करण्यासाठी मोजावे लागतात पैसे?

0
309

गोंदिया,दि.१६ः : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. दरम्यान एखाद्या व्यक्तीला जिल्ह्यातून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी ई-पास घेणे बंधनकारक आहे. अनेकवेळा ई-पास रिजेक्ट होत आहेत. रिजेक्ट झालेल्या ई-पास धारकांकडून पैसे घेऊन त्यांना ई-पास मंजूर होत असल्याचे प्रकाराची चर्चा असून यासाठी २०० ते ५०० रुपये प्रतीपास काही दलाल घेत असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चेवरून दिसून आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी २५ मार्चपासून संचारबंदी लागू आहे. दरम्यान सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांना परजिल्हा किंवा परराज्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पासच्या माध्यमातून परवानगी घ्यावी लागते. अनेकांना परवानगी मिळते तर काहींची परवानगी नाकारली जाते. ४-५ दिवसांपासून रायपूर येथे जाण्यासाठी एका व्यक्तीने मंजुरीसाठी प्रस्ताव टाकला होता. त्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. मात्र त्या व्यक्तीला त्यानंतर २०० रुपये घेऊन ई-पास देण्यात आल्याची चर्चा समोर आली आहे. दरम्यान अनेकांनी असा प्रकार काही दलाल करीत असल्याचेही सांगितले. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आहे की माहिती नाही, परंतु ई-पासच्या नावावर काही दलाल आपले फावले करून घेत असल्याचे दिसून येत आहे.