25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद

गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद

0
1680

गडचिरोली,दि.२४: गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांचे मीरा भाईंदर महानगर पालिेकेच्या आयुक्तपदी स्थानांतरण झाल्याने श्री.आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१६ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते नाशिक जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.कुमार आशीर्वाद यांनी आयआटी खरगपूर येथून बीटेक(सिव्हील इंजि.)केले आहे.