जिल्ह्यात सरासरी २८५.४ मि.मी. पाऊस

0
6

गोंदिया, दि.१० : जिल्ह्यात १ जून ते १० जुलै २०१५ या कालावधीत ९४१८.४ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी २८५.४ मि.मी. इतकी आहे. आज १० जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १०४४.७ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ३१.७ मि.मी. इतकी आहे.
१० जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १७१ मि.मी. (२४.४ मि.मी.), गोरेगाव तालुका- १३५.७ मि.मी. (४५.२ मि.मी.), तिरोडा तालुका- १०५.६ मि.मी. (२१.२ मि.मी.), अर्जुनी मोरगाव तालुका- ११०.६ मि.मी. (२२.२ मि.मी.), देवरी तालुका- ९२.४ मि.मी. (३०.८ मि.मी.), आमगाव तालुका- १६५.२ मि.मी. (४१.३ मि.मी.), सालेकसा तालुका- १४६ मि.मी. (४८.६ मि.मी.) आणि सडक अर्जुनी तालुका- ११८.२ मि.मी. (३९.४ मि.मी.) असा एकूण १०४४.७ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३१.७ मि.मी. इतकी आहे.