प्रोग्रेसिव्ह इंग्रजी हायस्कूल चित्रकला स्पर्धेतील यशस्वी

0
16

गोंदिया दि.१७: प्रोग्रसिव्ह शाळेत एकूण सहा गटात आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पार पडली.यात विविध शाखेच्या केजी-१ ते बारावीपर्यंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अ गटातील केजी १ व २ च्या विद्यार्थ्यांमधून रितू मेश्राम प्रथम, यश शिवणकर द्वितीय तर दक्ष कोठेवार तृतीय आला. तर प्राविण्य श्रेणीत आदित्य नायडू, महिका दानी, जान्हवी खोब्रागडे यांचा समावेश आहे. ब गटात प्रथम गायत्री येरणे, द्वितीय कुंजल गजापुरे व तृतीय हर्षा कोठेवार तसेच प्राविण्य श्रेणीत रिंकू सिंगणजुडे, हर्ष धोटे व पूर्वा बघेले यांचा समावेश आहे. क गटामधून प्रथम खुशी मौजे, द्वितीय रिधी मानकर, तृतीय कुणाल जांभूळकर व प्राविण्य श्रेणीत खुशी टेंभरे, अलिजा शेखे, दर्शिता दहिकर यांचा समावेश आहे. ड गटामधून प्रथम छवी ठाकूर, द्वितीय रिया कैथवास, तृतीय श्रृती शिवणकर व प्राविण्य श्रेणीत आयुषी दुरूगवार, आदित्य शर्मा, प्राजक्ता ढोमणे यांचा समावेश आहे. इ गटामधून प्रथम निशा खोब्रागडे, द्वितीय निधी ब्राह्मणकर, तृतीय संगीता महाराणा व प्राविण्य श्रेणीत रूचिका कांबळे, समिक्षा गुप्ता, गुणांगी भगत यांचा समावेश आहे. ई गटामधून प्रथम जान्हवी सोनवाने, द्वितीय युवती मानकर, तृतीय श्रृती ब्राह्मणकर व प्राविण्य श्रेणीत विवेक पटले, सूचिता मल्लिक यांचा समावेश असून त्यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.