23.5 C
Gondiā
Monday, July 7, 2025
Home Blog Page 2

जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं

0

राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मुंबई:-महाराष्ट्राच्या आजचा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेत मराठी एकतेचा विजय साजरा होत आहे.त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात ठाकरे बंधूंनी एकजुटीने आवाज उठवला, आणि त्यांच्या दबावामुळे महायुती सरकारने हा निर्णय रद्द केला. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यातून नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांना टोला लगावला.

त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध

*मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध केला होता. या सूत्रानुसार, शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

राज ठाकरे यांनीही सरकारला कडक इशारा दिला, “तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर!” या एकजुटीमुळे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली, आणि त्रिभाषा सूत्राचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. ही घटना मराठी भाषिकांसाठी मोठा विजय मानली जात आहे.

राजकीय पक्षाचा झेंडा नाही

वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेचा मुख्य उद्देश मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणे हा आहे. या सभेला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठी हाच अजेंडा असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मराठी एकतेचा संदेश दिला.

कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही २० वर्षांनी कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं ते फडणवीसांना जमलं, असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा,म्हणाले, “दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार”

0

मुंबई:-महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं.वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

भाषेच्या लढ्याला मोठं यश

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान

या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.

एकजुटीवर विशेष भर

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या एकजुटीवर विशेष भर दिला. “बऱ्याच वर्षांनंतर मी आणि राज एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आलोय. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही, आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहणार,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, “मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही मिळवला, आणि यापुढेही आम्ही लढत राहू,” असं म्हटलं.

ठाकरे बंधूंच्या या एकजुटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये मोठी फाळणी टळणार आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

मराठी जनतेला आवाहन

या सभेत मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलं, “आमच्या आजोबांनी भोंदूपणाविरोधात लढा दिला, आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.”

ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक एकजुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मराठी अस्मितेचा जागर करताना सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी ही एकजूट आगामी काळात काय परिणाम घडवून आणेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मराठी जनतेसाठी हा क्षण निश्चितच प्रेरणादायी आहे, आणि यामुळे राज्याच्या राजकारणात नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तत्काळ चुकारे द्या – आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई | तिरोडा-गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजय रहांगडाले यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील रबी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची व शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तात्काळ देण्याची मागणी केली.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामात धान उत्पादन होते. मात्र, शासनाकडून धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित ठेवले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही हमीभावाने धान विक्री करण्यास अपयश येते. परिणामी, त्यांना दलालांच्या माध्यमातून कमी दराने धान विकावे लागते. या पार्श्वभूमीवर धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवणे ही काळाची गरज असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी स्पष्ट केले.

तसेच मागील हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे अद्याप देय आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे थकीत चुकारे त्वरित दिले जावेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन या भेटीत देण्यात आले.

आमगाव तहसीलवर नागरिकांची धडक

0

आमगाव- महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडांगीपार, बनगाव, माल्ही, पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा बहाल करण्यात यावा, याकरिता अधिसूचना काढली. मात्र, या अधिसूचनेला 6 महिने लोटूनही अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या 7 गावांतील त्रस्त झालेल्या शेकडो संख्येत येऊन नागरिकांनी निकेश बाबा मिश्रा व तिरथ येटरे यांच्या नेतृत्वात अमर वराडे, सौरभ रोकडे, राजकुमार पुराम, संपत सोनी, जगदीश चुटे, बालू वंजारी, देवकांत बेहेकार, इसलाल भालेकर,भुमेश शेंडे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या 7 गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न, घरकूल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासलेले होते.परंतु, शासन या गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहेत.असा आरोप करुन बनगाव,बिरसी,पदमपुर, किडंगीपार येथील नागरिकांनी धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढला. यावेळी राजेश अग्रवाल, मुनेश पंचेश्वर, घनश्याम रहांगडाले, पिंटू अग्रहरी, संगीता पाथोडे, सोनू महानंदी, अनिता ठाकरे तसेच पुरुष महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोंडगाव सुरबन येथील युवकांनी केलेले कार्य प्रेरणादायी – लायकराम भेंडारकर

0

अखेर युवकांच्या पथक परिश्रमातून सुरू झाली गोरगरिबांची शाळा
अर्जुनी-मोर- हल्ली युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. विवाह सोहळे वाढदिवस आणि विशेषतः होळीच्या सणाला डीजेच्या तालावर नाचून प्राधान्याने मद्य घेण्याची परंपरा असतेच परंतु या परंपरेला फाटा देत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथे युवकांनी गरीब फाउंडेशन संघटनेच्या व्यासपीठाखाली एकत्र येत शिमगोत्सवातून जमा झालेला पैसा मटन पार्टी अथवा व्यसनात व्यर्थ खर्ची न करता धनदांडग्या श्रीमंत मुलांना मिळत असलेला कॉन्व्हेंटचे शिक्षण आपल्या गावातील ही गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाव यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतच पूर्व प्राथमिक (कॉन्व्हेंट) समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. या युवकांचा हा आदर्श प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
जवळील बोंडगाव सुरबन येथे ता. ०३ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट ) च्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार शिवसेना जिल्हाप्रमुख शैलेश जायसवाल, उपसभापती संदीप कापगते, भिवाजी मलगाम, देवराम हलमारे, हेमराज मानकर, पुरुषोत्तम चोरवाडे, मार्कंड चोरवाडे, दिलीप सयाम पो.पा.मनोज मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष गोवर्धन राऊत, ग्रामसेवक टीकाराम जनबंधू सुशीला हलमारे, नारायण हटवार, संचित वाढवे, सरपंच पुष्पाताई डोंगरवार, धनंजय हटवार, पुंडलिक ठलाल, हितेश हलमारे, नरेश बोरकर , रमेश बोरकर, राजेंद्र मारबते, शिवकुमार गोदेले, धनराज हर्षे, हिरालाल मानकर, उदाराम सयाम, सत्यशीला मडावी, किरण मानकर, रीना डोंगरवार, मीनाक्षी वंजारी, दीक्षा डोंगरवार, माधुरी सांगोळे, माया सयाम, मंजुषा हलमारे, कुंदा कोडापे, भास्कर दखणे, व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की स्थानिक युवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला गावातील नागरिक व शिक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे परिस्थिती आता बदलत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता खाजगी होणार, खाजगी शाळांना परवानगी दिली जाते असा भ्रम प्रसविला जातो. परंतु शासनाकडून असे कुठल्याही नवीन शाळेला परवानगी देण्यात आली नाही. पालकांनीही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे केवळ शासनावर अवलंबून राहता या युवकांप्रमाणेच गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षकांनीही केवळ वेतनापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे केवळ मैदानी खेळ नव्हे तर सांस्कृतिक बौद्धिक खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश सहारे, निखिल वाढवे, योगेश बोरकर, मनोहर मानकर, हितेंद्र शहारे, पंकज दरवडे, विलास हटवार, चेतन बोरकर, भोजराज मानकर, मुकेश नेवारे, राजेश मेश्राम, रुपचंद मानकर, समीर मेश्राम, टिंकू मेश्राम, हर्षल हटवार, आदी युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुरज डाखोळे यांनी तर आभार मुख्याध्यापक यशवंत शेंडे यांनी मानले.

सालेबर्डी येथे चित्रकला स्पर्धा व वृक्षारोपण

0

तिरोडा- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालेबर्डी येथे सहकार सप्ताह निमित्ताने एक पेड मॉं के नाम या विषयावर सहाय्यक निबंध कार्यालय तिरोडा  वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा उपनिबंधक (डी डी आर) अर्चना माळवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार कु शितल चक्रधर लांडे,
रोख 551 रुपये, द्वितीय पुरस्कार कनक उमाशंकर दमाहे रोख 351 रुपये व तृतीय पुरस्कार गुंजन जिवतू बाभरे 251 रुपये रोख ही पुरस्काराची रक्कम जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडून देण्यात आली. तसेच एक पेड माॅं के नाम ह्या उपक्रमांतर्गत जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, तिरोडाचे सहाय्यक उपनिबंधक डी.आर. नवगिरे, आमगावचे सहाय्यक उपनिबंधक हरिहर कुहिकर ,बबीता गिरीपुंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे , शिक्षण विस्तार अधिकारी जे डी अंबुले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमाशंकर दमाहे, शाळेचे मुख्याध्यापक के एस राहंगडाले, सहायक शिक्षक जे ए जांगडे, भूषण झरारिया, कुमारी आमरीन सय्यदा उपस्थित होते.जिल्हा उपनिबंधक श्रीमती माळवे ह्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.

मुख्याध्यापक विजय पटले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0

तिरोडा-तालुक्यातील प्रगती हायस्कूल सरांडी चे मुख्याध्यापक विजय मोडकुजी पटले हे नियतकालिन वयोमानानुसार दि.३०/६/२०२५ ला सेवानिवृत्त झाले.दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीपर सपत्नीक शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रगती हायस्कूल सरांडीचे माजी मुख्याध्यापक रामसागर धावडे, संस्थेचे सचिव डॉ.अभय पाटील, संस्थेचे अध्यक्ष माणिक वाणी, इतर पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षिका जयाताई धावडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात उपस्थित होते.सत्कार समारंभात अत्यंत भावूक होऊन बोलताना मुख्याध्यापक विजय पटले म्हणाले की मी माझे संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी समर्पित केले होते.विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा व माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला प्रेम आपुलकी माझ्या जिवनाची शिदोरी असेल, प्रगती हायस्कूल सदैव माझ्या स्मरणात कोरलेले असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कार्यरत असेल.

तिरोडा शहरके मुख्य बाजार मे स्थित पुराने हॉस्पिटल के जगहपर नगर परिषद ने बनाया डंपिंग यार्ड ?

0

तिरोडा – नगर परिषद के कुछ कचरा गाड़ीवाले तिरोडा शहरके मध्य मे स्थित पुराने हॉस्पिटल के खाली जगहपर कचरा डालते हैं। बारिश की वजह से सड़े हुए कचरे से बहुत ही दुर्गंध आती है। कांग्रेस ऑफिस के सामने स्थित इस स्थान पर डाले हुए कचरे की गंदगी से आजू-बाजू रहने वाले नागरिक और दुकानदार लोग बहुत परेशान हो गए हैं। इस गंदगी से नागरिकों का स्वास्थ्य भी खतरे में आया है। संबंधित विभाग ने तुरंत ध्यान देने की जरूरत है।

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

0
आरोग्य विभागाचा घेतला आढावा
बुलढाणा,दि. 4 : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे कराव, असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी, अशा सूचना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली त्यावेळी त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, आरोग्य उपसंचालक डॉ भंडारी, आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ, डॉ जीवन बच्छाव, उपसचिव विशाल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते
उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेत रिक्त जागा त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. क्षय मुक्त भारत बनविण्यासाठी निक्षयमित्र योजनेत सर्व अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संघटना, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करुन घ्या, अशा सूचना यावेळी केद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी दिल्या.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यन्वीत करण्यासाठी भौतीक सुविधा पोहचविणे आणि बांधकाम हे चांगल्या दर्जाचे करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . पीएमजेवाय योजने अंतर्गत आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत, तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करून एक महिन्याच्या आत सर्व लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्युदराचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जन औषधी केंद्र सुरू करा. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. जाधव यांनी यावेळी दिले.

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी

0

आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

नागपूर- विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती / शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा. यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शुक्रवार (ता. ४) विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. या प्रकरणाची प्रशासकीय, पोलिस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून यात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देतांना सांगितले.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अराजकता माजली आहे. शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा नागपूर या उपराजधानीत उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत. २ मे २०१२ पासून शिक्षक पदभरती बंद करण्यात आली. फेब्रुवारी २०१३ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २०१३ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या डीएड धारकांच्या नियुक्तीस मृत शिक्षणाधिकारीच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली. २०१९ नंतर या पदभरतीस बोगस शालार्थ आयडी मिळविण्यात आला. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची लूट करण्यात आली. या घोटाळ्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून जवळपास १००० कोटींच्या वर भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे.

नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नियुक्तीस मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरावर तात्काळ एसआयटी नियुक्त करावी. एसआयटीमध्ये गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करावा. नागपूर विभागातील बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळ्यातील निलंबित सूत्रधार गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. त्याला अटक कधी करणार? या घोटाळ्यात १८ च्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांना बडतर्फ करावे तसेच त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, आदी प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.

यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तरात नागपूर, भंडारा, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्याची मागणी पोलिस विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच संचालक, सहसंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार असून, यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भोयर सांगितले.