40.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5674

महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील- महादेव जानकर

0

‘केज कल्चर प्रणाली’तून रोजगाराच्या मुबलक संधी

मुंबई, दि. ६ : पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज
कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी
नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज केले.

तारापोरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जानकर
बोलत होते. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागाचे सचिव विजय कुमार,
मत्स्यविकास आयुक्त मधुकर गायकवाड, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे
कार्यकारी संचालक अरुण शिंदे उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले की, केज कल्चरच्या माध्यमातून
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख उद्देश असून त्या माध्यमातून
रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशात आंध्र प्रदेश
मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
येत्या काळात महाराष्ट्राला देशात मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर
आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी
सांगितले.

‘केज कल्चर’ प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये
यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना
राबविण्यात येणार आहे. आदिवासी असलेला कातकरी समाज हा मत्स्यव्यवसायात
असून मत्स्यव्यवसायाच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान
उंचावण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.

श्री. खोतकर यावेळी म्हणाले की, मत्स्यव्यवसाय धोरण व कार्यप्रणाली
आखण्यात आली आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन १.५ मेट्रिक टन असून
येत्या एका वर्षात ते दुपटीने वाढवून ३ मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे
उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले.

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार

0

मूर्तिजापूर, दि. 6 – भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. ही घटना हातगाव येथून जवळच असलेल्या सोनोरी पुलाजवळ ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. पोलीस स्टेशन माना येथील रहिवासी प्रकाश शालीकराम राऊत (४२), देवेंद्र हरिश्चंद्र सरदार (४२) आणि ११ वर्षीय सानिका देवेंद्र सरदार हे तिघे अकोल्यावरून दुचाकी क्रए एम.एच. ३० एएस ३७७९ ने आपल्या गावाकडे जामठी बु. येथे येत होते.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील सोनोरी गावानजीक असलेल्या पुलावर खड्डा वाचविण्याचे प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये बापलेकासह प्रकाश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

धुळ्याचे डॉ. रवी वानखेडकर “आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष

0

berartimes.com धुळे, दि.6:- देशभरातील तीन लाख डॉक्‍टर आणि दोन हजार शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या “आयएमए‘ या वैद्यकीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी येथील डॉ. रवी वानखेडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या रूपाने राज्याला दुसऱ्यांदा, तर धुळ्यासह खानदेशला प्रथमच हा बहुमान मिळाला.डॉ. वानखेडकर 2016- 2017 या कालावधीत “आयएमए‘चे “नॅशनल प्रेसिडेंट इलेक्‍ट‘ म्हणून आणि 2017-2018 या वर्षासाठी “नॅशनल प्रेसिडेंट‘ म्हणून जबाबदारी सांभाळतील. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर, तसेच उपक्रमशीलतेमुळे डॉ. वानखेडकर यांनी कार्यात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वैद्यकीय विश्‍वातील श्रेष्ठ अशा “आयएमए‘च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते विराजमान झाल्याने ती त्यांच्या यशाची पावती मानली जाते.

9 आदर्श शिक्षकांसह,गुणवंत विद्यार्थाचांही सत्कार

0

IMG-20160906-WA0137berartimes.com
गोंदिया,दि.6: : शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनी न घेता मंगळवारला(दि.६) घेण्यात आला.विशेष म्हणजे सकाळी ११ वाजताचा हा कार्यक्रम शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे तब्बल तीनतास उशीराने २ वाजता सुरु झाला.या कार्यक्रमात जिल्ह्यातील ९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे म्हणाल्या, जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना दर्जेेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शिक्षकांच्या सहभागाशिवाय हे काम अशक्य आहे. शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडविण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद््घाटन जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जि.प.सदस्य , प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम‘ आदी मान्यमवर उपस्थित होते.
अतिथींच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून सुनंदा रमेश ब्राम्हणकर, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा अर्जुनी , आमगाव तालुक्यातून सुरेश फोगल कटरे, जि.प. वरिष्ट प्राथमिक शाळा पिपरटोला, सालेकसा तालुक्यातून राधेश्याम गेंदलाल टेकाम, जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अशोक श्रावण नाकाडे, मुख्याध्यापक जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा चान्ना-बाक्टी, सडक-अर्जुनी तालुक्यातून उत्तम केवळराम बन्सोड, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धानोरी, गोरेगाव तालुक्यातून हरिराम केशव येळणे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा जानाटोला तर सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार आमगाव तालुक्यातील पुष्पलता लोकचंद क्षीरसागर, जि.प. प्राथमिक शाळा ढिवरटोला यांना गौरविण्यात आले.माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातून जि.प. हायस्कूल कावराबांध येथील भुवनेशवर बंडूजी सुलाखे तर सडक-अर्जुनी तालुक्यातून जि.प. हायस्कूल सडक-अर्जुनी येथील दुधराम पांडुरंग डोंगरवार यांना गौरविण्यात आले.

एमपीएससीच्या परीक्षेत धापेवाड्याच्या किर्तीकुमार कटरे राज्यात दुसरा

0

berartimes.com
गोंदिया,दि.6: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फेत जिल्हा महिला बालविकास अधिकारी (गट ब)या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंदिया तालु्क्यातील धापेवाडा निवासी किर्तीकुमार प्रकाश कटरे याने मागासवर्गीय गटात दुसरा येण्याचा मान पटकाविला आहे. किर्तीकुमार कटरे यांचे शिक्षण धापेवाडा व गोंदिया येथे झाले आहे. एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात द्वितीय आल्याबद्दल धापेवाडा येथील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा गावातील पहिलाच युवक असल्याने आनंदाचे वातावरण आहे. महिला बाल विकास अधिकारी या पदावर किर्तीकुमारची निवड झाली असून प्रशिक्षणासाठी गेलेला आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्राचा विकास हेच ध्येय ठेऊन सर्वांनी कार्य करावे – पालकमंत्री बडोले

0

– भाजपा अल्पसंख्यक आघाडी जिल्हा बैठक
गोंदिया,berartimes.com दि.6 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. अनेक धर्म, विविध जाती, पंथ व भाषांमुळे हिंदुस्थानला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख आहे. म्हणूनच कवी इकबाल म्हणतात ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोसिता हमारा.. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तिन्ही गोष्टीला एका माळेत टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. अखंड राष्ट्रवाद व राष्ट्राचा विकास हा भारतीय जनता पार्टीचे मुख्य ध्येय असून माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी. मागील साठ वर्षात फक्त अल्पसंख्यक समाजाच्या मतांचा वापर करून राजकारण करणाèयाचा खरा चेहरा समोर आला आहे. केंद्रात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार कार्य करीत असून अल्पसंख्यक समाजाच्या शिक्षणापासून तर सर्वांगीण विकासाकरीता अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व राष्ट्र विकासाचे ध्येय ठेऊन सर्वानी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यात मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय नव्हते व तशी मागणी होती यामुळे हे कार्यालय येथे सुरु होत आहे. अधिकाèयाची नेमणूक झाल्याचे हि त्यांनी या वेळी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला अनेक योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर होणार असल्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले म्हणाले. ते भाजपा अल्पसंख्यक आघाडीच्या विस्तारित जिल्हा बैठकीत उदघाटक म्हणून बोलत होते.
येथील प्रीतम लान येथे ४ सप्टेंबर रोजी अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने खासदार नानाभाऊ पटोले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आमदार भजनदास वैद्य, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आ खोमेश रहांगडाले,माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष कलाम शेख, जि प सभापती देवराज वडगाये, अ‍ॅड. अशफाक शेख, भाजपा जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, नासिरुद्दीन भालवानी आदी उपस्थित होते.
या वेळी खासदार पटोले म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकाआधी देशात विचित्र वातावरण निर्माण करण्यात आले होते. मुस्लिम समाजाच्या मनात भाजपा विरोधी व भीती निर्माण करणाèया अनेक गोष्टी टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र आज प्रत्यक्षात मुस्लिम समाजाच्या लक्षात आले आहे, विकास कोण करतोय. भारत देशाला जगात सर्वात पुढे नेण्याकरीता मोदीजी वेगाने कार्य करीत आहेत आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने साध्य होणार आहे. प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सर्वप्रथम अल्पसंख्यक आघाडीच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छया देऊन संघटनेसंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि भारतीय जनता पार्टी ही कार्यकत्र्यांची पार्टी असून यात कुणीही मालक किंवा संचालक नाही. इथे जात, पात व धर्म बघून संधी मिळत नसते तर सामन्यातील सामान्य कार्यकत्र्याला त्याच्या योग्यतेनुसार संधी मिळते. आम्ही एकसंघ लढलो नसतो तर स्वातंत्र्य मिळाले नसते. तसेच आज देशात पसरलेल्या आतंकवाद, नक्सलवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता दूर करून जातीमुक्त समाज निर्माण करण्याकरीता कार्य करायचे आहे. म्हणूनच समाजाची सेवा करण्यासाठी मुस्लिम समुदायाचे लोक भाजपात मोठ्या संख्येने पुढे येत आहेत असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी भाजपचा कार्यकर्ता हा संस्कारातून घडलेला असतो. तसेच समाजकारणातून राजकारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी केले.
या प्रसंगी आ विजय रहांगडाले, आ संजय पुराम, विनोद अग्रवाल, कलाम शेख, एजाज शेख यांनी हि मार्गदर्शन केले. संचालन अमीन शेख यांनी तर आभार माजीद खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमद मनियार, भास्कर नागदेवे, सतविंदरसिंग भाटिया, शशिकुमार पतेह, अनिल पाटणी, सलाम शेख, गुरविंदर सिंग कौर, सुशील जैन, अन्नुभाई शेख, युनूस खान, आबिद खान, सलीम भारवानी, शकील शेख, हमजा शेख, मतीन पठाण, इमरान शेख, शाईन शेख, जहीर खान, हब्बू शेख आदींनी सहकार्य केले.

    कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा 12 तास वीज पुरवठा-मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0

मुंबई,दि.6 : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावे यासाठी कृषीपंपाना  दिवसाच्या वेळी 12 तास वीज पुरवठा  नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वीजचोरीला आळा घालण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणे प्राधिकृत करावेत. सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनेर येथील  कारजुले पठार आणि निमोण येथे प्रायोगिक तत्वावर फिडर सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा, वीज चोरी रोखणे आणि सौरऊर्जेवर आधारित कृषीफिडरचे विद्युतीकरण याबाबत आढावा घेण्यात आला.  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
 राज्यात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील पीकांना पाण्याची गरज आहे.  शेतकऱ्यांच्या पीकांना नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी उपलब्ध आहे मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास पीकांना फायदा होईल त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 राज्यात वीजचोरीचे प्रमाण गंभीर आहे. वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यव होतो ते रोखण्यासाठी व वीज चोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करुन तेथे वीजचोरीची तक्रार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी वीज महामंडळामार्फत भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करुन वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या. वीजचोरी रोखण्यासाठी भरारी पथकासोबत स्थनिक पोलीसदेखील सहभागी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संगमनेर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प

          राज्यात कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के वीज वापरली जाते. शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करुन दिली जाते. ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचे विलगीकरण करण्यात आले असून अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेव्दारे वीजपुरवठा करण्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील कारजुले पठार व निमोन उपकेंद्र येथे प्रायोगिक तत्वावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी शासनाकडून स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येईल. या प्रकल्पासाठी खाजगी विकासकाची निवड केली जाईल त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येईल.राज्यात अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करण्यासाठी फ्रेंचाईसी मॉडेल तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सौर ऊर्जेवरील प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाचे वेळी शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होईल.शेती क्षेत्राचा चेहरा या प्रकल्पामुळे बदलण्यास मोठी मदत होणार असून सौर ऊर्जेवरील प्रकल्प यशस्वीरित्या सुरु करावे,असे प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीकरीता जिल्हाधिकारी, तहसीलदारांना पत्र देण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव  ‍मिलिंद म्हैसकर,महाऊर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक नितिन गद्रे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, नियोजन विभागाच्या सचिव मिता राजीव  लोचन आदि अधिकारी उपस्थित होते.

छत्तीसगढ़ः नाई समाज ने किया सवर्णों का बहिष्कार

0

(साभारा दलीत दस्तक)रायपूर,दि.6-अब तक हम यह खबर पढ़ते-सुनते आ रहे हैं कि सवर्णों ने दलितों का बहिष्कार कर दिया है. लेकिन एक खबर ऐसी आई है जिसने यह साबित किया है कि अगर कमजोर जातियों के बीच एकता हो जाए तो मनुवादी गुंडों को भी नाकों चने चबवा सकती है. घटना छत्तीसगढ़ की है. छत्तीसढ़ राज्य में एक गांव है हीरापुर. इस गांव के नाई समाज के लोगों ने सवर्णों का ही बहिष्कार कर दिया है. इस घटना से पूरे गांव के सवर्णों को करारा जवाब मिला है.

मामला असल में छह महीने पुराना है. गांव के दो नाबालिग लड़कों का आपस में झगड़ा हो गया. दोनों लड़के अलग-अलग समुदाय के थे. इसमें नाई समाज का भी लड़का शामिल था. इस मामले ने काफी तूल पकड़ा. नाई समाज के लोगों को इंसाफ नहीं मिला तो उन्होंने बदला लेने का दूसरा तरीका निकाल लिया. असल में मामला हल होता नहीं देख नाई समाज के लोगों ने सवर्ण समाज के लोगों के बाल काटने बंद कर दिए और उनका बहिष्कार कर दिया. इससे सवर्णों में खलबली मच गई. पहले तो नाई समाज के लोगों को दबाने और डराने की कोशिश की गई, लेकिन सारा नाई समाज एक-दूसरे का हाथ थामे एकजुट खड़ा हो गया.

हीरागांव के समर्थन में पड़ोस के परसुदा और खुरथुली के लोग भी आ गए. आखिरकार जातिवादी गुंडों की एक ना चली. आलम यह है कि अब यहां के सवर्ण अब खुद ही एक-दूसरे के दाढी बाल काटते हैं. यहां तक कि पिछले दिनों सवर्ण समाज के घर में मृत्यु होने के बावजूद हिन्दू रीति के मुताबिक दसवें दिन बाल काटने के लिए भी नाई समाज के लोग नहीं पहुंचे और सवर्ण समाज के लोगों को आपस में ही यह विधि करनी पड़ी.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र व्हावी : राष्ट्रपती

0

नवी दिल्ली,दि.6 : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सततच्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासाच्या कामांवर परिणाम होतो, असंही राष्ट्रपती म्हणाले.
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवानत एका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रणव मुखर्जींनी शिकवलं. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकांमधील खर्चावर प्रश्न केला. त्याला उत्तर देताना प्रणव मुखर्जींनी लोकसभेबरोबर विधानसभांची निवडणूक व्हावी असं मत व्यक्त केेले.
“देशभरात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणूक सुरु असते. त्यामुळे प्रशासनातील मोठी कुमक या निवडणुकांसाठी काम करत असते. विविध निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे सरकारला नवे निर्णय घेता येत नाही आणि सर्व कामकाजही ठप्प होतं,” असं राष्ट्रपतींनी सांगितले.
या प्रक्रियेतून तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी मिळून यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायला हवा असंही मुखर्जी यांनी सांगितले.
देशाच्या विकासासाठी कमी निवडणुका असण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं होतं. मोदी आणि भाजपकडून सातत्याने हा प्रस्ताव ठेवला जातो.मागील वर्षी न्याय आणि कायदा मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा सल्ला दिला होता.काँग्रेसचे शशी थरुर यांनीही यास समर्थन दिले आहे,परंतु डाव्या पक्षांचा मात्र विरोध दिसून येत आहे.

शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गौरव

0

तिरोडा,दि.6- : आदर्श शिक्षक म्हटले की साने गुरूजी आठवतात. शिक्षकी पेशाला मोठी परंपरा आहे. आज जगात ज्ञानाची क्रांती झाली असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या अनेक समस्या असल्या तरी त्यावर मात करून त्यांनी आपले काम योग्य प्रकारे करावे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त व आदर्शशिक्षकांचा सत्कार समारंभ सोमवारी शिक्षक दिनानिमित्त स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना.बडोले बोलत होते. आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. यावेळी आ.गिरीष व्यास,माजी आमदार हेमंत पटले, माजी आ.भजनदास वैद्य, हरिष मोरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जि.प.सदस्य रजनी सोयाम, विश्वजित डोंगरे,सभापती दिलीप चौधरी,उपसभापती बबलू बिसेन, पवन पटले, रमनिक सोयाम, हितेंद्र लिल्हारे, माधुरी टेंभरे आदी मंचावर विराजमान होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात खा.पटोले म्हणाले, आजच्या स्थितीत आपण विचार केला असता भंडारा व गोंदिया जिल्हा शिक्षणात मागे पडला आहे.शिक्षणात खूप मोठे बदल होत आहेत. शिक्षण प्रणालीत झालेले बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी शिकविले पाहिजे.
धापेवाडा टप्पा-१ व २पूर्ण झाले पाहिजे. अजूनही तलावात पाणी पडले नाही. त्यामुळे शेतात पाणी पोहोचू शकले नाही. वैनगंगेचे पाणी शेतात आलेच पाहिजे. लवकरच खळबंदा तलावात पाणी पडेल. काही विभागाच्या परवानग्या बाकी होत्या त्या प्राप्त झालेल्या आहे. अदानी प्रकल्पाने मात्र स्थानिकांचा नोकर्‍याबाबत अपेक्षाभंग केला, असे ते म्हणाले.
आ.विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.विकास कामे केलीत, न.प.ला ९ कोटी विकासासाठी आणून दिले. शिक्षकांच्या माध्यमातून शासकीय विविध योजनांची खेड्यापर्यंत पोहचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून गुरूचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले. संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांनी तर आभार प्रदर्शन अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ.वसंत भगत, संजू बैस, भाऊराव कठाने, पिंटू रहांगडाले, चत्रुभूज बिसेन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्यकेले.