39.8 C
Gondiā
Monday, May 19, 2025
Home Blog Page 5691

अ‍ॅड. मुकेश रहांगडाले यांचा संशयास्पद मृत्यू?

0

गोंदिया- सडक अर्जूनी येथील नामांकित वकील अ‍ॅड. मुकेश रहांगडाले यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे.
अ‍ॅड. मुकेश रहांगडाले हे नामांकित वकील असून ते गोंदिया जिल्ह्यातील अनेक कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करीत होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांचे खास विश्वासू पैकी एक होते. त्यांचा अकस्मात मृत्यू हा संशयास्पद असल्याच्या चर्चा परिसरात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.

अॅड. मुकेश रहांगडाले हे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहो. अॅड. रहांगडाले यांच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त केल्याशिवाय समोर येणार नसल्याच्या प्रतिक्रिया जिल्हात उमटत आहेत.

विविध मागण्यांना घेऊन विज कामगार फेडरेशनचे आंदोलन

0

गोंदिया,(berartimes.com)दि.22- महाराष्ट्र राज्य विज कामगार,अभियंते,अधिकारी कृती समिती संघटनेच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन गोंदिया येथील विज वितरण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करुन मागण्याचे निवेदन मुख्य अभियंता जनविर यांना सादर करण्यात आले.त्या निवेदनात महाराष्ट्रातील विज निर्मितीचे पुर्ण संच पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे.तिन्ही कंपन्याचा स्टाॅप सेटअफ व नार्मस ठरविण्यात यावे.वितरण कपंनीचे प्रादेशिक विभाग करण्याचा विचार करण्यात यावा.तिन्ही कंपन्यातील कर्मचायाचे बदली धोरण विचार विनिमय करुन ठरविण्यात यावे.रिक्त जागासांठी भरती प्रकिया सुरु करण्यात यावे या मागण्याचा समावेश होता.आजच्या एकदिवसीय आंदोलनातर्गंत दिलेल्या मागण्यांचा विचार न केल्यास 30 आॅगस्ट रोजी मुंबई येथील प्रकाशगड मु्ख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळीस सबआर्डीनेट इंजिनिर्यस असो.चे इजिं.हरिष डायरे,सुहास धामनकर,विवेक काकडे,प्रशांत भोंगाडे,पी.डी.पवार,ए.बी.कुरेशी,राजु गंधारे,राजेश येळे, दिगंबर कटरे सहसचिव म.रा.विज कामगार फेडरेशन इंटक गोंदिया,योगेश्वर सोनूले,विजय चौधरी,राजेश जांगळे,कुमार कोकणे,हर्षल बोंदरे,विश्वनाथ दुबे,अजय उमप,पंकज आखाळे,प्रदिप राऊत,सुरज चव्हाण,सुनिल मोहुर्ले,सुशिल शिंदे,सागर श्रीवास्तव,विक्रम काटोले,श्वेता मोरे,प्रियंका भारती,सोनम पुडके,सुनीता मेश्राम,शुभा मेश्राम,महा.रा.राष्ट्रीय विज कामगार फेडरेशन(इंटक),विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,म.रा.वि.म.श्रमिक काँग्रेस तसेच कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

काशिघाट शेजारील कोल्हापूरी बंधारा फुटला

0

गोंदिया,दि.22-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातर्गत येणार्या तिरोडा उपविभागातील गराडाजवळील काशीघाट नाल्यावर तयार करण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा अवघ्या तीन वर्षातच कोलमडल्याचे चित्र बघावयास मिळाले.लघु पाटबंधारे उपविभाग तिरोडाच्यावतीने तीन वर्षापुर्वी या नाल्यावर बंधारा तयार करण्यात आला होता.हा बंधारा आज पुर्णत तुटला असून या बंधार्यातूनच अदानी वीज प्रकल्पाचा दुषीत पाणी वाहून जात होता.बंधाराकडे बघितल्यास बंधारा तयार करतांना कुठलेही नियोजन अभियंत्याने केले नसावे असेच दिसून येत आहे.विशेष ज्या म्हणजे या काशीघाटावर मोठी यात्रा सुध्दा भरते पर्यटनस्थल म्हणून हे स्थळ नावारुपास असतानाही या ठिकाणी बंधार्याचे निकृष्ट बांधकाम करण्याची हिमंत तत्कालीन अभियंत्याने कंत्राटदारासोबत कुणाच्या हिमतीवर केली असावी हा संशोधनाचा विषय ठरला आहे.त्यावेळी गायधने हे अभियंता म्हणून काम बघत होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.गराडा परिसरातील नागरिकांनी सदर बंधारा पुर्णत तुटल्याची तक्रार गोंदिया लघु पाटबंधारे उपविभागाकडे केल्याची माहिती गावातीलच नागरिकांनी बेरार टाईम्सला दिली आहे.या तक्रारीची चौकशी उपविभागाचे अधिकारी घेऊन दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत घालण्यासोबतच अभियंत्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पाविरोधात आविसंचा पुन्हा एल्गार

0

गडचिरोली,दि.२२: गोदावरी नदीवरील प्रस्तावित मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पासंदर्भात उद्या दोन्ही राज्य सरकारमध्ये करार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आदिवासी विद्यार्थी संघाने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देऊन प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळच्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार बॅरेज बनवीत आहे. या बॅरेजच्या विरोधात तेथील संघर्ष समितीने यात्रा काढली होती. तरीही तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता २ मे रोजी भूमिपूजन केले होते. त्यावेळीही काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार दीपक आत्राम यांनी स्वतंत्रपणे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून प्रखर विरोध केला होता. आता २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक होणार असून, दोन्ही सरकारमध्ये अंतिम करार होणार आहे. त्यामुळे या कराराचा निषेध म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दोन्ही सरकारकडून बाधित शेतकऱ्यांची सिरोंचा येथील तहसील कार्यालयात तत्काळ जनसुनावणी घ्यावी, अन्यथा आविसंतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दीपक आत्राम यांनी यावेळी दिला. याप्रसंगी आविसंचे सल्लागार रवी सल्लम, सडवली कुमरी, रवी बोंगोनी, श्याम बेझलवार, मारोती गणापुरपू, गादे सोमय्या, श्रीनिवास गंटा, बापू सडमेक, मदनय्या दुर्गम, विजय रेपालवार, चौधरी समय्या, अजय आत्राम,नारायण मुडीमाडीगेला, रामानंद मारगोनी, लक्ष्मण बोल्ले, मलय्या सोन्नारी, अशोक कावरे, कोठा व्यंकन्ना, सडवली जनगम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली,(berartimes.com) दि. २२ – सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकत्याच संपलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ललिताने 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत अंतिम फेरीत ९ वे स्थान मिळवले होते.

ललिता पदकाने हुलकावणी दिली तरी, १९८४ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अ‍ॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली होती.

दुसरीकडे महाराष्ट्राचा गुणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. तो ही आपल्या गुणवत्तेच्या बळावर भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावत आहे. अजिंक्य आणि ललिता बाबरसह अन्य १५ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.

२०१६ अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे –
रजत चौहान (तिरंदाजी)

ललिता बाबर (अ‍ॅथलेटिक्स)

सौरव कोठारी (बिलियर्ड्स अँड स्नूकर)

शिवा थापा (बॉक्सिंग)

अंजिक्य रहाणे (क्रिकेट)

सुब्रता पॉल (फुटबॉल)

राणी (हॉकी)

रघुनाथ व्ही आर (हॉकी)

गुरप्रीत सिंह (नेमबाजी)

अपूर्वी चंडेला (नेमबाजी)

सौम्यजीत घोष (टेबल टेनिस)

विनेश फोगट (कुस्ती)

अमित कुमार (कुस्ती)

संदीप सिंह मान (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स)

वीरेंद्र सिंह (कुस्ती)

नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून के. व्यकंटेशम यांची नियुक्ती

0

नागपूर, दि. २२ – अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदावर बदली करण्यात आली आहे.

राज्यातील सहा वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रायलयाने आज जारी केले. त्यात व्यंकटेशम आणि यादव यांचाही समावेश आहे. मुळचे आंध्रप्रदेशातील असलेले व्यंकटेशम १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ही महत्वपूर्ण जबाबदारी होती. स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे.

त्यांनी राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांमध्ये आमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या असून, अधिकारी, कर्मचा-यांना तणावमुक्त काम करता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

अन्य चार अधिका-यांमध्ये रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून, एस. जगन्नाथन यांची व्यंकटेशम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर, केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची बदली ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) या पदावर तर, मकरंद रानडे यांचे ठाणे आयुक्तालयातच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेली आहे.

गोंदियासह राज्यातील 10 विमानतळांच्या विकासासाठी मंत्रीमंडळाची मंजुरी

0

मुंबई,दि.22- केंद्र शासनाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रादेशिक जोड योजनेसाठी (रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम) राज्य सरकारचा केंद्र शासनाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी उद्या (दि.23 ऑगस्ट) सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराच्या मसुद्यास आज (दि.22)सोमवारला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या करारांतर्गत विविध सवलती देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणात देशातील वेगवेगळे प्रदेश विमानसेवेने जोडण्यासाठी आर्थिक मदत देण्यासह त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने या धोरणांतर्गत प्रादेशिक जोड योजना (रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम) प्रस्तावित केली आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी महाराष्ट्र सरकार 23 ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करणार आहे. या करारात राज्याकडून द्यावयाच्या सवलती उल्लेखित होणार आहेत. त्यामुळे या कराराच्या मसुद्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 10 शहरातील विमानतळांचा समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.
सामंजस्य कराराच्या मसुद्यात राज्य शासनाकडून द्यावयाच्या सवलतींबाबतच्या तरतुदी समाविष्ट आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या विमानतळांसाठी लागणाऱ्या इंधनावरील मुल्यवर्धित कराचा दर 10 वर्षासाठी एक टक्का इतका करण्यात येईल, विमानतळांच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक तेवढी जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल, या विमानतळांना रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतुकीचे मार्ग आदींनी जोडण्यात येईल, विमानतळांना पोलीस आणि अग्निशामक सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येतील, राज्य शासनाकडून या विमानतळांना वीज, पाणी आणि इतर सुविधा भरीव सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील, या विमानतळांच्या प्रादेशिक मार्गांवर विमानवाहतुकीचा खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यातील तफावत (Viability Gap) भरून काढण्यासाठी संबंधित विमानतळ परिचालकास (Airport Operator) देय असलेल्या निधीची (Viability Gap Funding-VGF) तरतूद केंद्र सरकार 80 टक्के तर राज्य सरकार 20 टक्के यापद्धतीने केली जाईल आदी सवलतींचा त्यात समावेश आहे. याशिवायही राज्य सरकार अधिक सवलती देऊ शकेल, असे या मसुद्यात आश्वासित करण्यात आले आहे.

भाग्यश्रीची विभागीय विज्ञान स्पर्धेकरिता निवड

0

गोरेगाव,दि.22- माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात गोरेगाव येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयाची विद्यार्थीनी भाग्यश्री थानेश्वर चौधरी हिने व्दितीय क्रमांक पटकावला.तिची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेकरिता झाली आहे.गोंदिया येथील सिंधी हायस्कुल आज सोमवारला(दि.22) पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात तिची निवड करण्यात आली. तीचे व मार्गदर्शक शिक्षक ए. एच. कटरे यांचे संस्था अध्यक्ष डाॅ. टी. पी. येडे, संस्था सचिव एड़. टी. बी. कटरे, प्राचार्य एच. डी. कावळे, पर्यवेक्षक वाय. आर. चौधरी, व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

युवा स्वाभीमानच्या भीक मांगो आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद

0

IMG-20160822-WA0112छायाचित्र-गोंदिया शहरात युवा स्वाभीमान व बंसत ठाकुर यांच्यावतीने भीक मांगो आंदोलनार्तंगत आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याघरी भीक मागण्यात आले

गोंदिया(berartimes.com)दि.२२ -जिल्हा सामान्य कुवर तिलकqसह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या विविध समस्यांना घेऊन सुरु असलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी आज (दि.२२) युवा स्वाभीमान संघटनेच्यावतीने तसेच आंदोलनकर्ते वसंत ठाकूर यांच्यासह आंदोलकांनी भीक मांगो आंदोलन करुन दोन हजारावर निधी गोळा करण्यात आला.येथील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलकांनी तसेच युवा स्वाभीमानच्या कार्यकत्र्यांनी भीक मांगो आंदोलन केले यावेळी आमदार अग्रवाल यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांनी मदत निधी देत आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला.तसेच आमदार अग्रवाल समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु सरकार त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे आंदोलकांना सांगितले.भीक मांगो आंदोलनात गोळा केलेल्या निधीचा धनादेश उद्या मंगळवारला जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरवात केटीएस जिल्हा रुग्मालयातून करण्यात आली.शहरातील जयस्तंभ चौक,गोरेलाल चौक,गांधी प्रतिमा,चांदणी चौक,शहर पोलीस स्टेशन ,आमदार निवास मार्गे नेहरु चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेश राणे,वाय.पी.येळे, बंसत ठाकुर,टोनेश हरिणखेडे,विनोद गौतम,मनोज बिसेन,अरqवद टेंभरे,भरत शरणागत,राजेंद्र पटले,जिवनलाल शरणागत,जगदिश रहागंडाले,कमल राणे,सुनिल वाघमारे,मनुताई उईके,किरण रावते,
स्मीता मेंढे,रवी रहांगडाले,कमल लिल्हारे,नरेंद्र राणे,हौसलाल कटरे,पवन नामणे,शुभम चन्नोरे,शैलेशे लदवार,हिवराज टेंभरे,योगेश टालटे,विकास रहागंडाले,गौरव कोठेवार,दुर्गेश गाते,विकास लामकासे,विक्रम सोनवाने,योगेश डिब्बे,भुमेश गौतम,राजू राऊत,रवी गाते,वाल्मिक ठाकुर,हुमेंद्र पारधी,अनमोल ब्राम्हणकर,राहुल कटरे,सोनल येवले,विक्की बिसेन,विजय पटले,सुनिल साठवणे,संदिप येवले,राजेश कनोजिया,सन्नी लगडे,प्रमोद शहारे,सुनिल यादव आदी आंदोलनकारी सहभागी झाले होते.
गंगाबाई रुग्णालय व केटीएसमधील अव्यवस्था दुरुस्त व्हावी यासाठी १४ ऑगस्टपासून हे आंदोलन करण्यात येत आहे.युवा स्वाभीमानचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी स्वत याप्रकरणी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

२९ ऑगस्टला विधिमंडळाचे ‘जीएसटी’साठी विशेष अधिवेशन

0

मुंबई – येत्या २९ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी) मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन २९ ऑगस्टला घेण्याचे राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी निश्चित केले. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. केवळ अण्णा द्रमुकच्या खासदारांनी या विधेयकाच्या मंजुरीवेळी सभात्याग केला. दोन्ही सभागृहातील उर्वरित सर्व पक्षांनी घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला. वस्तू व सेवा कर विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील राज्य विधिमंडळाच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक २९ ऑगस्टला मांडण्यात येईल आणि त्याला मंजुरी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.