काशिघाट शेजारील कोल्हापूरी बंधारा फुटला

0
7

गोंदिया,दि.22-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातर्गत येणार्या तिरोडा उपविभागातील गराडाजवळील काशीघाट नाल्यावर तयार करण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा अवघ्या तीन वर्षातच कोलमडल्याचे चित्र बघावयास मिळाले.लघु पाटबंधारे उपविभाग तिरोडाच्यावतीने तीन वर्षापुर्वी या नाल्यावर बंधारा तयार करण्यात आला होता.हा बंधारा आज पुर्णत तुटला असून या बंधार्यातूनच अदानी वीज प्रकल्पाचा दुषीत पाणी वाहून जात होता.बंधाराकडे बघितल्यास बंधारा तयार करतांना कुठलेही नियोजन अभियंत्याने केले नसावे असेच दिसून येत आहे.विशेष ज्या म्हणजे या काशीघाटावर मोठी यात्रा सुध्दा भरते पर्यटनस्थल म्हणून हे स्थळ नावारुपास असतानाही या ठिकाणी बंधार्याचे निकृष्ट बांधकाम करण्याची हिमंत तत्कालीन अभियंत्याने कंत्राटदारासोबत कुणाच्या हिमतीवर केली असावी हा संशोधनाचा विषय ठरला आहे.त्यावेळी गायधने हे अभियंता म्हणून काम बघत होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.गराडा परिसरातील नागरिकांनी सदर बंधारा पुर्णत तुटल्याची तक्रार गोंदिया लघु पाटबंधारे उपविभागाकडे केल्याची माहिती गावातीलच नागरिकांनी बेरार टाईम्सला दिली आहे.या तक्रारीची चौकशी उपविभागाचे अधिकारी घेऊन दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत घालण्यासोबतच अभियंत्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.