ट्रव्हल्स मॅक्स अपघातात 3 ठार तर 18 जखमी

0
15
तुमसर,दि.01 :येथून अवघ्या २ किमी अंतरावरील कटंगी मार्गावरील  मेहगाव येथे  आज १ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास झालेल्या वर्हाडी ट्रॅव्हल्स व प्रवाशांची वाहतुक करणार्या मॅक्स वाहनाच्या अपघातात ३ जण ठार तर १८ जण जखमी झाल्याची घटना घडली.ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.५०पी.०२१८ हि तिरोडी इथुन वक्हाडयांना घेवुन तुमसर येथे मुस्लीम बांधवाचा सामुहिक विवाह सोहळा  समारंभाच्या कार्यक्रमात येत असतांना कटंगी मार्गावरील  मेहगाव येथे प्रवाशांची वाहतुक करणाºया मॅक्स गाडी क्र. एम.एच ३१ एच.४१९३ ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मॅक्स गाडीचा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन गंभीर जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातात तिघे जण ठार झाले असून मृतकांमध्ये दिनेशराव चौधरी वय ४२ रा. डोंगरी बुज., प्रकाश गोन्नाडे वय ३७ रा. पवनारा व कुसुम पृथ्वीराज तरोदे वय ५५ रा. कुरमुडा यांचा समावेश आगे.तर जखमींमध्ये गळीराम बर्वे वय ६० रा. बालापूर, कमला हेमराज पुष्पतोडे वय ५० रा. कुरमुडा, सुमजा गळीराम बर्वे वय ४५ रा.बालापूर ,गायत्री धनराज मलघाटी वय ४५ रा. बालापूर, सच्चीया बी वय ६० रा. तिरोडी,सदिना बी वय ६५ रा. तिरोडी,हसीना महकुस पठान वय ४० रा. गोंदिया,सिया साहू वय ४ वर्ष रा. रायपुर,अजीजा बी वय ७५ रा. तिरोडी, दिलीप रामचंद उईके वय ३० रा. तिरोडी,सखीचा इकबाल पठान वय ४० रा. लोखंडी नगर नागपूर, मंजू अरविंद दुधभुरे वय ४० रा. लोखंडी नगर नागपूर, रोशण कहालकर वय २४ रा. बामणी माडगी ,नसीमा शेख वय ३८ रा. आमगाव,मुरजाक बेगम वय ६२ रा. गोंदिया,वर्षा विलास शेंडे वय २९ रा. परसवाडा,नायमीन शेख वय ७ रा. तिरोडी आणि अखबेज शेख वय ४ वर्ष रा. तिरोडी यांचा समावेश आहे. या दुदैवी घटनेमुळे  तुमसर शहरात  शोककळा पसरलेली आहे. याप्रकरणी तुमसर पोलीस तपास करीत आहे.