अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या प्रचाराला सुरवात

0
20

सडक अर्जुनी,दि.02 :- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा  निवडणूक प्रचाराचा नारळ सौंदड येथे फोडून प्रचाराला सुरवात करण्यात आली.यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश नंदागवळी,सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अध्यक्ष शेषरावजी गि-हेपूंजे,माजी सभापती अशोक लंजे,अनिल राजगिरे,सरपंच गायत्री ईरले,उपसरपंच सुनिल राउत, इक्बाल शेख,शरद भेंडारकर,टिकाराम चुटे,विनोद कावळे,समाधान बडोले,शिवचरण शहारे व ईतर काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.यावेळी नंदागवळी यांनी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात मजबूत करण्यासाठी व विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती देण्यासाठी गावागावत जाणार असल्याचे सांगितले.