हिरक महोत्सवानिमित्त नोंदणी अभियान

0
8
सगरोळीच्या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांना आवाहन
 बिलोली (सय्यद रियाज),दि.18ः-  सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेस ६० वर्ष पूर्ण होत असल्याने संस्था हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. यानिमित्त भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून गत ६० वर्षातील माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यासाठी नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने १९५८ साली कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी संस्कृती संवर्धन मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. ६० वर्षात सामाजिक गरजा लक्ष घेऊन शिक्षणासह आरोग्य, पर्यावरण, महिला सबलीकरण, कृषी, जलसंधारण आदी क्षेत्रात संस्था भरीव कार्य करीत आहे. संस्था स्थापनेपासूनच स्थानिक व परिसरातील ग्रामस्थ, हितचिंतक, माजी विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या बळावरच संस्थेचे  ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करित आहे.
माजी विद्यार्थी हा संस्थेचा पायाभूत घटक आहे. हिरक महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये भव्य माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात येणार असल्याने सर्व कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती  असावी यासाठी मागील साठ वर्षातील माजी विद्यार्थी नोंदणी अभियानास सुरुवात केली आहे. संस्थेने सेंटर पॉंईंट बिल्डींग, शिवाजी नगर  नांदेड येथे जिल्हा संपर्क कार्यालय सुरु केले असल्याचे हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी आपला अद्ययावत पत्ता, भ्रमणध्वनी व मेल आयडी संस्थेचे   मेल [email protected] किंवा ९५११८००३४२ या वॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा असे कळविले आहे.