सईद अहमद शेख मुसा (४१) असे आरोपीचे नाव आहे. ४२ वर्षीय कंत्राटदाराला साडेआठ लाख रुपयांचे कंत्राटाचे बिल काढण्यासाठी अहमद याने ४० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी कंत्राटदार याने अकोला एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने आजच तक्रारीची पडताळणी केली.
तक्रार दाराच्या माहितीनंतर एसीबीने नियोजित ठिकाणी सापळा रचला. तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर एसीबीला इशारा केला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीने अहमदला अटक केली. तसेच त्याच्याकडून लाचेची ३० हजराची रक्कम ताब्यात घेतली. पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.