राजोली भरनोली परिसरात चक्रिवादळ व गारपीट

0
23

अर्जुनी मोर,दि.02:- तालुक्यातील राजोली भरनोली परिसरात आज सायं. 4 ते 4:30 च्या दरम्यान प्रचंड चक्रिवादळ व गारपिटीसह पाऊस आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील राजोली भरनोली परिसरातील सायगाव बोरटोला.शिवरामटोला व अन्य गावामध्ये आज ता.2 मे रोजी सायं.4 ते 4:30च्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात चक्रिवादळ व प्रचंड पाऊस व गारपीट आल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे अनेक घरावरील टिनपत्रे व कवेलु उडाल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली.आहे.विद्युत खांब व तारा तुटल्यामुळे विज पुरवठा खंडीत झाला आहे. चक्रिवादळ व गारपिटीसह पाऊस आल्याने रब्बी धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजोली भरनोली महसूल मंडळाचे तलाठी व्हि.बी.साखरे व पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर यांचे सोबत नुकसान ग्रस्ताची पहाणी करुन पंचनामा करीत आहेत.