दलित वस्ती दुरूस्तीसाठी १ कोटीचा निधी मंजूर

0
23

गोंदिया,दि.05 : सामाजिक विकास योजना अंतर्गत गोंदिया तालुक्यातील दलित वस्तींचा दुरूस्ती व विकासासाठी १ कोटींचा निधीला मंजूर प्रदान करण्यात आली आहे. हा निधी मिळावा, यासाठी
मागील अनेक दिवसांपासून आमदार गोपालदास अग्रवाल हे प्रयत्नरत होते. अखेर शासनाने निधीला मंजुरी दिली. त्यामुळे दलित वस्तींमध्ये आवश्यक सोयी-सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार
आहे.
क्षेत्राच्या विकासासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सततत पाठपुरावा करून निधी खेचून आणला आहे. तालुक्यातील दलित वस्तींमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मागील अनेक दिवसांपासून आमदार अग्रवाल प्रयत्नरत होते. शासनाने याची दखल घेवून १ कोटीचा निधीला मंजुरी दिली आहे. या १ कोटीच्या निधीतून दलित वस्तींतील प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत. यात परसवाडा, झिलमिली येथे १०-१० लाखाच्या निधीतून सभामंडप, बलमाटोला येथे ३ लाखाच्या निधीतून बौध्दविहार निर्माण, बिरसी (कामठा),पांजरा, लंबाटोला, धापेवाडा, रतनारा, चंगेरा,बिरसोला, काटी, बाजारटोला, गर्रा, कोचेवाही,वडेगाव, सिरपुर, पुâलचूरटोला, कारंजा, बिरसी (दा), नवेगाव (पा), नागरा, अंभोरा, माकडी,शिवनी, दासगाव खुर्द, खमारी, दतोरा येथे प्रत्येकी ३ लाख रूपयाच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकाम तर सतोना येथे बौध्द विहाराच्या आवारभिंत बांधकाम आदि कामांचा समावेश आहे.