गवराळा गावात बिबट्याचा गायीवर हल्ला

0
12
लाखांदुर,दि.10 :शेतशिवारातील गोठ्यात बांधलेल्या काही पाळीव जनावरांपैकी एका गायीवर वाघाने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली.सदर घटना लाखांदुर तालुक्यातील गवराळा गावातील शेतशिवारात शनिवारी ९ जुन रोजी  पहाटे दरम्यान ऊघडकिस आली. मन्साराम राऊत असे पिडीत पशुपालकाचे नाव आहे.मागील काही वर्षापासुन या पशुपालकाचे मालकी शेतशिवारात पाळीव पशुधनाचे पालनपोषण सुरू होते. नेहमीप्रमाणे घटनेच्या आदल्या दिवशी पाळीव गुरा ढोरांना मालकिच्या शेतशिवारातील गोठ्यात बांधले असतांना अचानक पहाटेदरम्यान वाघाने हल्ला चढविला. या घटनेत गोठ्यातील एका गायीचा वाघाने जागीच बळी घेतला.
    दरम्यान मागील ४ महिण्यापासुन चौरास व्याप्त भागात पाण्याच्या शोधात वन्यजिवांनी धाव घेतल्याच्या घटना ऊघडकिस आले असतांनाही वन विभाग सुस्तावलेलाच दिसुन येत आहे. राजनी गावातील भर वस्तीतील घरात बिबट्याचा ६ तासाचा वास्तव्य तर पाऊनगावातील शेतशिवारातील घरात बिबट्याने ठोकलेला २ दिवसाचा मुक्काम सबंध जनतेसह वनविभागाला ठाऊक असतांना चौरासातील गवराळा गावातील घटना भयावह ठरली आहे.चुलबंध पाञात पाणी सोडण्याच्या बाता हाकतांना वन्य जिवांनी चौरासात मजल केली कशी असा देखील प्रश्न जनतेत केला जात आहे.सबंधित प्रकरणी वनविभागाने तात्काळ दखल घेऊन मृत पशुपालकाला मदत करावी अशी मागणी जनतेत केली जात आहे.