31.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5671

पवनी-धाबे येथे १२२ रक्त बाटल रक्त संकलित

0

berartimes.com नवेगावबांध,दि.8 : जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम यांच्या ५0 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लष्करातील जवानांसाठी ५0 हजार रक्तबाटल्या व महाराष्ट्र सरकारला ५0 हजार रक्तबाटल्या असे एकूण एक लाख बाटल्या दान करण्याचा महासंकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री संप्रदाय तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने ३ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे येथे १२२ रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या.
रक्तदान शिबिरादरम्यान श्री संप्रदायाचे अनुयायी, ए.ओ.पी. पवनी-धाबे.चे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे.चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, आश्रम शाळा, जि.प. शाळा व महाविद्यालय तसेच परिसरातील युवावर्ग अशा १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उद््घाटन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य मंदा कुंभरे, पं.स. सदस्य प्रेेमलाल गेडाम, सरपंच केसराम छीकुंवर, डॉ. हजारे, डॉ.मेंढे, पीएसआय पाटील, नाजूक कुंभरे, नरेश बुडगेवार, विश्‍वेसर कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवक कल्याण डोंबविलेचे दशरथ घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ता शैलेश जायस्वाल यांनी भेट दिली व कौतुक केले. कार्यक्रमासाठी सर्व सेवा केंद्राचे अध्यक्ष, तालुका, जिल्हा कमिटीचे अधिकारी तसेच मंजुषा तरोणे, जयपाल खांडवाये, पुरुषोत्तम वल्के, रमेश मस्के, भेंडारकर, पटे, रामकृष्ण भोयर, रमेश बाकरे यांनी सहकार्य केले. संचालन महेंद्र रहिले यांनी केले. आभार गावड यांनी मानले.

गोवारीटोल्यातील महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

0

berartimes.com गोंदिया,दि.८ : ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत. हाच पैसा त्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यास आधार ठरला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करून आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, उद्योजकता विकासाबाबत प्रशिक्षण देवून आणि योग्य मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला आहे. गोवारीटोल्यातील आदिवासीबहुल महिला सभासदांसाठी संजीवनी आदिवासी स्वयं सहाय्यता महिला बचतगट त्यांच्यासाठी मार्गदाता ठरला आहे.
गोरेगाव तालुका मुख्यालयापासून २३ कि.मी. अंतरावर असलेले गोवारीटोला हे गांव. गावातील १0 आदिवासी व अन्य समाजातील महिलांनी एकत्न येवून संजीवनी महिला बचतगटाची स्थापना २0 ऑक्टोबर २00८ रोजी आदिवासी उपयोजनेंतर्गत केली. चोपा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजीवनी बचतगटाने आपले बचत खाते उघडले. सुरु वातीला ५0 रूपये याप्रमाणे बचतगटातील प्रत्येक महिला बँकेत महिन्याकाठी बचत करु लागली. माविमच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्‍वास बळावला.
जानेवारी २0१३ पासून प्रत्येक महिला महिन्याला १00 रूपये बचतगटाच्या बँक खात्यात पैसे जमा करु लागली. महिलांची दर महिन्याला नियमित बचत आणि अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण बघून दिलेले प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे आपणही उद्योग-व्यवसाय सुरु करु न स्वावलंबी होवू शकतो, असा आत्मविश्‍वास महिलांमध्ये निर्माण झाला. गटातील अंतर्गत कर्जाचा उपयोग महिलांनी शेती, आरोग्य, घरकाम आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी केला. माविमच्या माध्यमातून संजीवनीच्या महिलांना आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, लेखा संच आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण मिळाले.
बचतगटातील महिलांनी आपल्या कष्टातून जमा केलेले ३६ हजार रूपये ३ वर्षाकरिता जानेवारी २0१५ मध्ये फिक्स डिपॉझीट केले. आता त्यांना जानेवारी २0१८मध्ये ४८ हजार रूपये मिळणार आहेत. बचतगटातील महिलांची अंतर्गत कर्जामध्ये गरज पूर्ण होत नसल्यामुळे माविमच्या सहयोगिनी रत्नमाला सरजारे यांच्या मार्गदर्शनाने आयसीआयसीआय बँकेकडून १६ एप्रिल २0१३ ला एक लाख ९६ हजार ९00 रु पयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच १६ नोव्हेंबर २0१५ मध्ये याच बँकेकडून पुन्हा ३ लाख ३४ हजार ८00 रु पये बचतगटाला कर्ज मिळवून देण्यात सहयोगिनी सरजारे यांनी मोलाची मदत केली.
बचतगटातील उत्तरा औरासे यांनी ५0 हजार रु पये, रु पाली औरासे यांनी ५0 हजार रु पये आणि छाया येळे यांनी ७५ हजार रु पये कर्ज घेवून शेतीला सिंचनाची बारमाही व्यवस्था व्हावी म्हणून स्वत:च्या शेतात बोअरवेल करून घेतली. केवळ खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेती करणार्‍या महिलांना रबी व उन्हाळी पिकांसाठी बोअरवेल उपयुक्त ठरली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थोड्या शेतीतून उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली.
शेवंता बिसेन यांनी ७५ हजार रु पयांतून मालवाहक गाडी खरेदी केली. तसेच बचतगटातून अंतर्गत कर्ज म्हणून ४५ हजार रूपये घेवून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरु केला. बचतगटामुळे मालवाहक गाडीला भाडे मिळू लागले आणि डेकोरेशनचा व्यवसायही चांगला चालू लागला.
संजीवनी महिला स्वयंसहायता बचतगटामुळे महिलांच्या उत्पन्नाचे आर्थिक स्त्नोत वाढण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार लागण्यासही मदत झाली.

दाभोलकरांचे खूनी सनातनचेच – सीबीआय

0

वृत्तसंस्था
पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्याच सदस्यांचा हात असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवार) दाखल केलेल्या आरोपपत्रांत म्हटले आहे.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आज सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात दाभोलकरांच्या हत्येमागे सनातनच्या साधकांचा हात असून, या प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे हा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तर, विनय पवार आणि सारंग अकोलकर या सनातनच्या साधकांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे.

सारंग अकोलकर हा मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आहे. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आलेली आहे. पवार हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तोही 2009 पासून फरार आहे. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.सीबीआयने हिंदू जनजागरण समितीचा सदस्य असलेल्या वीरेंद्र तावडे याला तीन महिन्यांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेली आहे. सीबीआयने 40 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार बनविण्यात आलेली दोन रेखाचित्रेही आहेत.

कृषिमंत्री बिसेन लेंगें एग्रीकल्चर लीडरशीप अवार्ड

0

बालाघाट(मध्यप्रदेश)दि.7-मध्यप्रदेश शासन के किसान कल्याण एवं कृषि विकास मंत्री गौरीशंकर बिसेन ने आज 07 सितम्बर को दिल्ली में केन्द्रीय भू-तल एवं सड़क परिवहन मंत्री नीतिन गडकरी, केन्द्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह, केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेन्द्र सिंह तोमर एवं केन्द्रीय संचार मंत्री रविशंकर प्रसाद से मुलाकात की और प्रदेश व बालाघाट जिले के विकास कार्यों के प्रस्ताव उन्हें सौंपे है। कृषिमंत्री बिसेन 08 सितम्बर को दिल्ली में आयोजित कार्यक्रम में केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह से मध्यप्रदेश के मुख्यमंत्री के प्रतिनिधि के रूप में एग्रीकल्चर लीडरशीप अवार्ड ग्रहण करेंगें।

वैनगंगा नदी पर चार पुलों के प्रस्ताव को मंजूरी
कृषि मंत्री बिसेन ने केन्द्रीय भू-तल एवं सड़क परिवहन मंत्री नीतिन गड़करी से मुलाकात के दौरान बालाघाट जिले में वैनगंगा नदी पर चार पुलों के निर्माण के लिए राशि उपलब्ध कराने का प्रस्ताव सौंपा है। इन चार पुलों में वैनगंगा नदी पर धपेरा कुम्हारी के बीच, कनकी में, जागपुर घाट में पुल निर्माण के प्रस्ताव शामिल है। केन्द्रीय मंत्री गड़करी ने वैनगंगा नदी पर चार पुल बनाने के लिए केन्द्रीय मद से राशि प्रदान करने के लिए सहमति प्रदान कर दी है। उल्लेखनीय है कि राज्य शासन से इन चार पुलों के निर्माण के लिए केन्द्र को पूर्व में ही प्रस्ताव भेजा जा चुका है।

खरीफ में अतिवृष्टि से प्रभावित फसलों के राहत की मांग
कृषि मंत्री बिसेन ने केन्द्रीय कृषि मंत्री श्री राधामोहन सिंह से मुलाकात के दौरान उन्हें मध्यप्रदेश की कृषि की स्थिति से अवगत कराया और बताया कि इस वर्ष अतिवर्षा के कारण मध्यप्रदेश में खरीफ की 4 से 8 लाख हेक्टेयर क्षेत्र की फसले प्रभावित हुई है। इन खराब हुई फसलों के मुआवजे के लिए केन्द्र से राशि उपलब्ध कराने की मांग की गई है। उन्होंने बताया कि इस वर्ष मध्यप्रदेश में कुल 123 लाख हेक्टेयर क्षेत्र में खरीफ फसले लगाई गई है। इस वर्ष दलहन फसलों को लगाने पर अधिक जोर दिया गया है। इसके कारण प्रदेश में दलहनी फसलों का रबका गत वर्ष के 17 लाख हेक्टेयर से बढ़कर इस वर्ष 22 लाख हेक्टेयर तक पहुंच गया है।
कृषि मंत्री बिसेन ने केन्द्रीय कृषि मंत्री को अवगत कराया कि मध्यप्रदेश में दलहनी फसलों के रकबे में इस वर्ष 5 लाख हेक्टेयर क्षेत्र की वृद्धि हुई है। किसानों की मूंग की फसल अब कटने के लिए तैयार होने की स्थिति में है। मूंग का अधिक उत्पादन होने को लेकर उसके दामों में कमी आ रही है। प्रदेश के किसानों को मूंग का सही दाम मिल सके और मूंग 5275 रुपये प्रति क्विंटल से कम पर न बिके इसके लिए प्रदेश में समर्थन मूल्य पर मूंग की खरीदी नाफेड एवं एफसीआई से कराने का प्रस्ताव उन्होंने केन्द्रीय कृषि मंत्री को सौंपा है। केन्द्रीय कृषि मंत्री ने श्री बिसेन को बताया कि भारत सरकार ने सभी राज्यों से मूंग की समर्थन मूल्य पर खरीदी के लिए प्रस्ताव मंगाये है और इस पर किसानों के हित में शीघ्र ही निर्णय लिया जायेगा।

पुल-पुलियों एवं सड़क निर्माण के प्रस्ताव
कृषि मंत्री गौरीशंकर बिसेन ने केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेन्द्र सिंह तोमर से मुलाकात के दौरान उन्हें बालाघाट जिले के नक्सल प्रभावित क्षेत्र लांजी, बैहर, बिरसा व परसवाड़ा में पुल-पुलियों एवं प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना के अंतर्गत सड़कों के निर्माण के प्रस्ताव सौंपे है। श्री बिसेन ने केन्द्रीय संचार मंत्री श्री रविशंकर प्रसाद से बालाघाट जिले में संचार सुविधाओं के विस्तार के लिए चर्चा की।

सातबारा संगणकीकरणाचे काम तातडीने पूर्ण करा- मुख्यमंत्री

0

तलाठ्यांच्या प्रश्नांबाबत शा़सन सकारात्मक
मुंबई, दि. 7 : राज्यातील तलाठ्यांच्या प्रश्नांबाबत शासन
नेहमीच सकारात्मक आहे. तलाठ्यांनी 7/12 संगणकीकरण व दुरुस्त्यांबाबतचे
काम तातडीने पूर्ण करुन डिजिटल इंडिया मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत ई-म्युटेशनबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री
श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,
राज्यमंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार
श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, माहिती व
तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद
म्हैसकर, जमाबंदी आयुक्त संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र राज्य तलाठी
पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांच्यासह भारत
संचार निगम लि. व राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC)चे अधिकारी,
तलाठी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 7/12 संगणकीकरण व त्यामध्ये दुरुस्त्या
करण्यासाठी तलाठ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्या सोडविण्यासाठी सर्व
संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्याचबरोबर
तलाठ्यांनी 7/12 संगणकीकरणामधील दुरुस्त्या येत्या तीन महिन्यात पूर्ण
करुन खातेदारांना बिनचूक संगणकीकृत 7/12 उपलब्ध करुन द्यावा. बिनचूक
संगणकीकृत 7/12 ही डिजिटल महाराष्ट्राची महत्त्वाची उपलब्धी असेल, असे
सांगून राज्यातील तलाठ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच
सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील 357 तालुक्यांमध्ये 7/12 संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
राज्यात 2 कोटी 45 लाख 52 हजार 246 खातेदार आहेत. राज्यात 2437 तालुका व
मंडळाच्या ठिकाणांपैकी 1658 ठिकाणी संगणकीकरणाचे काम करण्याची सुविधा
उपलब्ध आहे. यामध्ये वाढ करण्याबरोबरच सर्व्हरचा स्पीड वाढविणे,
ॲप्लिकेशनमध्ये बदल व कनेक्टिव्हिटी वाढविणे या अडचणी सोडविण्यात येणार
असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीत तलाठ्यांची रिक्त पदे भरणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे,
कार्यालयांसाठी इमारत बांधणे, तसेच त्यांना लॅपटॉप व प्रिंटर देणे आदी
विषयांवर चर्चा करण्यात आली.

कुंभीटोल्यात जलयुक्तमुळे गवसला कृषी समृध्दीचा मार्ग

0

berartimes.com
गोंदिया,दि.7- शेती हा ग्रामीण जीवनाचा आधार. बहुतांश शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून शेती करणे म्हणजे बेभरोशाचे काम. मात्र राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाने ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना जलसाक्षर करण्याचे महत्वपूर्ण काम केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावातील पाणी गावशिवार आणि शेतातील पाणी शेतशिवारात अडविण्यात आले. पाणी अडवून भूगर्भात जिरविण्यात आल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. संरक्षित आणि विकेंद्रीत पाणीसाठे जलयुक्त शिवार अभियानातून तयार करण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादकता देखील वाढली.
सन २०१४-१५ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व कृषि विभागाने शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे शेतकरी जलसाक्षर झाले. अभियानाच्या माध्यमातून अडविण्यात आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर शेतीच्या सिंचनासाठी कसा करता येईल यादृष्टीने संबंधित गावांनी नियोजन देखील केले.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला हे शेतकरी बहुल गांव. गावातील कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतमजूरी करणारे कुटुंबही गावात आहेत. कुंभीटोल्याचे भौगोलिक ३२८ हेक्टर क्षेत्रापैकी २२८ हेक्टर जमीन ही पिकाखाली आहे. मुख्य पीक धानाचे असल्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून तर रब्बी हंगामात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे काही शेतकरी धान पिकच घेतात.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषि विभागाने तीन सिमेंट नाला बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे हे नाले दुथडी भरुन वाहू लागले. नाल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना बंधाऱ्यामुळे अडलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात करता आला. २ एकर शेती असलेले शेतकरी गहाणे म्हणाले, या बंधाऱ्यामुळे शेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली. धान पिकाला एका पाण्याच्या कमतरतेमुळे येणारी घट भरुन तर निघाली सोबत उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. नाल्याच्या परिसरात असलेल्या विंधन विहिरी आणि विहिरींतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. आता रब्बी हंगामात जलयुक्त शिवार अभियानातून नाल्यावर बांधलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे उपलब्ध पाण्यातून लाखोरी, जवस आणि हरबरा पीक घेण्याचे नियोजन केल्याचे गहाणे यांनी सांगितले.
बोडी नुतनीकरणाचे काम जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता तर वाढलीच सोबत शेतीतून जास्त उत्पादन घेण्याचा आत्मविश्वास बळावल्याचे पृथ्वीराज राऊत या शेतकऱ्याने सांगितले. पूर्वजांनी बांधलेल्या बोडीतील गाळ काढण्यात येवून ती खोल करण्यात आल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली. बोडी नुतनीकरणामुळे संरक्षित पाणीसाठा निर्माण झाला. संरक्षित पाणीसाठ्याचा वापर पुढे रब्बी हंगामात भाजीपाला, जवस, हरबरा, लाखोरी, उडीद व मुगाचे पीक घेण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीपुरक व्यवसाय म्हणून मत्स्योत्पादन बोडीतून करण्याचा विचार असल्याचे राऊत म्हणाले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आणि बोडीतील गाळ काढण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढल्याचे त्यांनी सांगितले. बोडी नुतनीकरणामुळे जवळपास ३ हेक्टर शेतीला फायदा झाल्याचे राऊत म्हणाले.
कुंभीटोल्याच्या वहितीखालील क्षेत्रातील परिसरात तीन सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरणाची ५ कामे, १ शेततळे निर्मिती, बोडी खोलीकरणाचे एक काम, भात खाचरे दुरुस्तीची १३ कामे आणि बोडीतील गाळ काढण्याचे तीन कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानातून ही कामे करण्यात आल्यामुळे १५०.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला.जलयुक्त शिवार अभियानातून कुंभीटोल्याच्या वहितीखालील क्षेत्रात संरक्षित जलसाठा तर निर्माण झालाच सोबत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. शेतीत गाळ टाकण्यात आल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील वाढली. कुंभीटोल्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषी समृध्दीचा मार्ग गवसल्याचे शेतकरी अभिमानाने सांगू लागले आहेत.

कोटगल बॅरेज प्रकल्पासाठी वित्तमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

0

berartimes.comगडचिरोली,दि.7- जिल्यातील वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरज प्रकल्पाला सन २०११ मध्ये दिलेली प्रशासकीय मान्यता नोव्हेंबर २०१६ मध्ये व्यपगत होऊ नये यासाठी सदर प्रकल्पासाठी आकस्मिकता निधीतून तरतूद करण्यास मान्यता द्यावी अशी विनंती वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांचेकडे केली. सदर प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. अशोक नेते यांच्‍यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेउन याविषयावर त्‍यांच्‍याशी चर्चा केली. कोटगल प्रकल्पासाठी निधीची तरतुद केल्यास गोदावरी नदी पात्रातील पाणी वापरासाठी घ्यावयाचे पुरेसे प्रकल्प हाती राहतील असे मुनगंटीवार यांनी राज्यपालांना सांगितले. बैठकीला प्रधान सचिव (व्यय) व्ही गिरीराज, जलसंपदा विभागाचे सचिव व्ही के कुलकर्णी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अनुसूचित जातीतील सर्व समाजाच्या पाठीशी सरकार – मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई,दि.7 -महाराष्ट्र राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीकडून अनुसूचित व अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करुन सामजिक स्वास्थ्य बिघविण्याचे षडयंत्र चालू असून अनुसूचित जाती व नवबौध्द अल्पसंख्यांक समाजाने घाबरण्याचे कारण नसून भाजपाचे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई येथील यशवंतराव सभागृहात भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दुष्यंतकुमार गौतमजी, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री आ.विजय (भाई) गिरकर, खा.अमर साबळे, आ.नानाजी शामकुळे, माजी खा.भाऊसाहेब वाघचौरे, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष वाय.सी.पवार, डॉ.विजयाताई काळे, आ.रामचंद्र अवसरे, माजी आमदार राम गुंडीले, प्रदेश चिटणीस आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष दुष्यंतकुमार गौतमजी म्हणाले, देशात भाजपाचे सरकार अल्यापासून सामजिक परिवर्तन घडत आहे. गेले 60 वर्ष काँग्रेसची पारंपारिक वोट बँक असणारा अल्पसंख्यांक व अनुसूचित समाज आता समझदार झाले आहेत. व भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून जगभरात पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. म्हणून देशात वेमुला प्रकरण, उना प्रकरण, कोपर्डी प्रकरण, राजकीय भांडवल म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वापरत आहे. तेव्हा अनुसूचित जातीच्या समाजाने सतर्क राहिले पहिजे असे ही ते म्हणाले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, भाजपा सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानतेला न्याय दिला आहे. लंडन येथील त्यांचे राहते घर शासनानेविकत घेवून जागतीक स्मारक म्हणून घोषित केले. तर मुंबई येथील इंदू मिलची जागा ताब्यात घेवून राष्ट्रीय स्मारक उभे करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते भमिपुजन झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पंचतीर्थ स्थळे विकसित करुन जगाला आकर्षण वाटेल असे स्मारके करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरच अंमलात येईल असे ते म्हणाले.
सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीपजी कांबळे म्हणाले की, राज्यातील अ​नुसूचित जातीच्या सामजिक स्तर उंचावण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष पातळीवरुन विधायक कामांना प्राधान्य द्यावे. काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांच्या कामासाठीची शिफारस घेवू नये. मागील युती सरकराच्या कामाची पुनरावृत्ती होता कामा नये असे त्यांनी कार्यकर्त्यांना निर्वाणीची समज दिली.
माजी मंत्री आ.रि गिरकर म्हणाले, केंदात व राज्यात भाजपाचे सरकार आल्याने परिवर्तनाची लाट आली आहे. फुले-शाहु-आंबेडकर यांची केवळ भाषणात नावे न घेता ख-या अर्थाने त्यांच्याविचाराने भाजपा सरकार काम करीत आहे. अनुसचित जातीच्या समाजावरील अत्याचारासाठी पुर्वीचे सरकार स्पॉन्सर होते. राज्यातील अनुसूचित जातीच्या समाजाच्या पाठीशी भाजपा सरकार भक्कमपणे उभे आहे असे ते म्हणाले.
खा.अमर साबळे म्हणाले की, आंबेडकरी जनतेला न्याय देण्यासाठी भाजपाने राज्यातून रामदासजी आठवले, नरेंद्र जाधव व मला राज्यसभेत कोणतेही आरक्षण नसतांना खासदार केले. व रामदास आठवले यांना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री पद देवून समाजाला न्यायदिला आहे म्हणून अनुसूचित व नवबौध्द समाजाला मोठा ख-या अर्थाने न्याय व आधारमिळाला असल्याचा संदेश समाजामध्ये पसरला असल्याचे ते म्हणाले.भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुभाष पारधी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,अनुसूचित जातीतील समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षकार्य व सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून अनुसूचित जातीच्या सर्व घटकाला मोठा न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यातील राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, सदस्य व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.बैठकीत प्रदेश सरचिटणीस श्री.सुकदेव अडागळे यांनी आढावा घेतला.संचालन प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, आभार प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत हिवराळे यांनी मानले.

पोलिसांवर हल्ले करणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे – उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ७ – राज्यातील पोलिसांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत असून पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर कल्याणमध्ये पुन्हा खाकी वर्दीवर हात उचलण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ‘ ज्यांच्यावर इतरांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्यावरच हल्ले होतान दिसत असून कायद्याच्या रक्षमकर्त्यांनाच आता सुरक्षा देण्याची’ वेळ ओढावली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिस कुटुंबियांसह बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली.

रेतीमाफियांनी जाळली पवनीची पोलीस चौकी?

0

गोंदिया,दि.7-भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील कनिष्ट न्यायालयासमोर असलेल्या पोलीस चौकीला तथाकथीत रेतीमाफियांनी आग लावल्याची घटना मंगळवारच्या रात्रीला घडली असून पवनीचे नायब तहसिलदार व संबधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.लाखांदूर-नागपूर मार्गावरुन होणार्या अवैध वाहतुकीला तसेच अोव्हरलोड रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ही पोलीस चौकी सुरु करण्यात आली होती.मंगळवारला जेव्हा ट्रकचालक रेती भरुन जात असताना 4 ब्रासची राॅयल्टी असताना 5 ब्रास रेती वाहतुक करीत असल्याचे सांगत 10 हजाराची मागणी नायबतहसिलदाराने केल्याची चर्चा आहे.दरम्यान नायबतहसिलदार व सोबत असलेल्या पोलीसांने ट्रकचालक व क्लिनरला ट्रकमधून ओढत बाहेर काढत असतानाच मागून येणार्या ट्रकच्या चाकात येऊन ट्रकचालक व क्लिनरचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे.भंडारा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांनी स्वत रात्रीला घटनास्थल गाठून ट्रक आपल्या ताब्यात घेऊन परिस्थितिवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले.परंतु ट्रकचालकांनी नायबतहसिलदारसह पोलीसावर गुन्हा दाखल करुन कारवाईच्या मागणीला घेऊन तीर्व भूमिका घेत रात्रीच्यावेळी पोलीचचौकीलाच आग लावल्याची चर्चा असून पवनीमध्ये सध्या वातावरण तापले आहे.