रेतीमाफियांनी जाळली पवनीची पोलीस चौकी?

0
7

गोंदिया,दि.7-भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील कनिष्ट न्यायालयासमोर असलेल्या पोलीस चौकीला तथाकथीत रेतीमाफियांनी आग लावल्याची घटना मंगळवारच्या रात्रीला घडली असून पवनीचे नायब तहसिलदार व संबधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.लाखांदूर-नागपूर मार्गावरुन होणार्या अवैध वाहतुकीला तसेच अोव्हरलोड रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ही पोलीस चौकी सुरु करण्यात आली होती.मंगळवारला जेव्हा ट्रकचालक रेती भरुन जात असताना 4 ब्रासची राॅयल्टी असताना 5 ब्रास रेती वाहतुक करीत असल्याचे सांगत 10 हजाराची मागणी नायबतहसिलदाराने केल्याची चर्चा आहे.दरम्यान नायबतहसिलदार व सोबत असलेल्या पोलीसांने ट्रकचालक व क्लिनरला ट्रकमधून ओढत बाहेर काढत असतानाच मागून येणार्या ट्रकच्या चाकात येऊन ट्रकचालक व क्लिनरचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे.भंडारा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांनी स्वत रात्रीला घटनास्थल गाठून ट्रक आपल्या ताब्यात घेऊन परिस्थितिवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले.परंतु ट्रकचालकांनी नायबतहसिलदारसह पोलीसावर गुन्हा दाखल करुन कारवाईच्या मागणीला घेऊन तीर्व भूमिका घेत रात्रीच्यावेळी पोलीचचौकीलाच आग लावल्याची चर्चा असून पवनीमध्ये सध्या वातावरण तापले आहे.