कोटगल बॅरेज प्रकल्पासाठी वित्तमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
18

berartimes.comगडचिरोली,दि.7- जिल्यातील वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरज प्रकल्पाला सन २०११ मध्ये दिलेली प्रशासकीय मान्यता नोव्हेंबर २०१६ मध्ये व्यपगत होऊ नये यासाठी सदर प्रकल्पासाठी आकस्मिकता निधीतून तरतूद करण्यास मान्यता द्यावी अशी विनंती वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांचेकडे केली. सदर प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. अशोक नेते यांच्‍यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेउन याविषयावर त्‍यांच्‍याशी चर्चा केली. कोटगल प्रकल्पासाठी निधीची तरतुद केल्यास गोदावरी नदी पात्रातील पाणी वापरासाठी घ्यावयाचे पुरेसे प्रकल्प हाती राहतील असे मुनगंटीवार यांनी राज्यपालांना सांगितले. बैठकीला प्रधान सचिव (व्यय) व्ही गिरीराज, जलसंपदा विभागाचे सचिव व्ही के कुलकर्णी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.