राज्यातील अनुसूचित जातीतील सर्व समाजाच्या पाठीशी सरकार – मुख्यमंत्री फडणवीस

0
17

मुंबई,दि.7 -महाराष्ट्र राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीकडून अनुसूचित व अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करुन सामजिक स्वास्थ्य बिघविण्याचे षडयंत्र चालू असून अनुसूचित जाती व नवबौध्द अल्पसंख्यांक समाजाने घाबरण्याचे कारण नसून भाजपाचे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई येथील यशवंतराव सभागृहात भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दुष्यंतकुमार गौतमजी, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री आ.विजय (भाई) गिरकर, खा.अमर साबळे, आ.नानाजी शामकुळे, माजी खा.भाऊसाहेब वाघचौरे, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष वाय.सी.पवार, डॉ.विजयाताई काळे, आ.रामचंद्र अवसरे, माजी आमदार राम गुंडीले, प्रदेश चिटणीस आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष दुष्यंतकुमार गौतमजी म्हणाले, देशात भाजपाचे सरकार अल्यापासून सामजिक परिवर्तन घडत आहे. गेले 60 वर्ष काँग्रेसची पारंपारिक वोट बँक असणारा अल्पसंख्यांक व अनुसूचित समाज आता समझदार झाले आहेत. व भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून जगभरात पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. म्हणून देशात वेमुला प्रकरण, उना प्रकरण, कोपर्डी प्रकरण, राजकीय भांडवल म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वापरत आहे. तेव्हा अनुसूचित जातीच्या समाजाने सतर्क राहिले पहिजे असे ही ते म्हणाले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, भाजपा सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानतेला न्याय दिला आहे. लंडन येथील त्यांचे राहते घर शासनानेविकत घेवून जागतीक स्मारक म्हणून घोषित केले. तर मुंबई येथील इंदू मिलची जागा ताब्यात घेवून राष्ट्रीय स्मारक उभे करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते भमिपुजन झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पंचतीर्थ स्थळे विकसित करुन जगाला आकर्षण वाटेल असे स्मारके करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरच अंमलात येईल असे ते म्हणाले.
सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीपजी कांबळे म्हणाले की, राज्यातील अ​नुसूचित जातीच्या सामजिक स्तर उंचावण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष पातळीवरुन विधायक कामांना प्राधान्य द्यावे. काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांच्या कामासाठीची शिफारस घेवू नये. मागील युती सरकराच्या कामाची पुनरावृत्ती होता कामा नये असे त्यांनी कार्यकर्त्यांना निर्वाणीची समज दिली.
माजी मंत्री आ.रि गिरकर म्हणाले, केंदात व राज्यात भाजपाचे सरकार आल्याने परिवर्तनाची लाट आली आहे. फुले-शाहु-आंबेडकर यांची केवळ भाषणात नावे न घेता ख-या अर्थाने त्यांच्याविचाराने भाजपा सरकार काम करीत आहे. अनुसचित जातीच्या समाजावरील अत्याचारासाठी पुर्वीचे सरकार स्पॉन्सर होते. राज्यातील अनुसूचित जातीच्या समाजाच्या पाठीशी भाजपा सरकार भक्कमपणे उभे आहे असे ते म्हणाले.
खा.अमर साबळे म्हणाले की, आंबेडकरी जनतेला न्याय देण्यासाठी भाजपाने राज्यातून रामदासजी आठवले, नरेंद्र जाधव व मला राज्यसभेत कोणतेही आरक्षण नसतांना खासदार केले. व रामदास आठवले यांना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री पद देवून समाजाला न्यायदिला आहे म्हणून अनुसूचित व नवबौध्द समाजाला मोठा ख-या अर्थाने न्याय व आधारमिळाला असल्याचा संदेश समाजामध्ये पसरला असल्याचे ते म्हणाले.भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुभाष पारधी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,अनुसूचित जातीतील समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षकार्य व सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून अनुसूचित जातीच्या सर्व घटकाला मोठा न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यातील राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, सदस्य व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.बैठकीत प्रदेश सरचिटणीस श्री.सुकदेव अडागळे यांनी आढावा घेतला.संचालन प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, आभार प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत हिवराळे यांनी मानले.