34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5668

रिओमध्ये सुवर्णपदक, मात्र पॅरालिंपिकमध्ये

0

रिओ दी जानिरो- ब्राझीलची राजधानी रिओ दी जानिरोमध्ये झालेल्या पंगूंच्या ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. मात्र त्याच ठिकाणी सुरू असलेल्या अपंगाच्या ऑलिंपिकमध्ये (पॅरालिंपिक) मरियप्पन थांगावेलूने ही कसर भरून काढली. त्याने पुरुषांच्या टी ४२ प्रकारात १.८९ मीटर उंच उडी घेत सुवर्णपदकाची कमाई केली. याच प्रकारात वरुण सिंग भाटी तिसरा आला. त्याला कांस्यपदक मिळाले. मरियप्पन हा उजव्या तसेच वरुण हा डाव्या पायाने अधून आहे.

पॅरालिंपिकमध्ये एका प्रकारात दोन पदके मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सुवर्ण आणि कांस्यपदक मिळवलेल्या थांगावेलू आणि भाटीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, महानायक अमिताभ बच्चन, क्रीडामंत्री विजय गोयल, रिओमधील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग, ऑलिंपिक पदकविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजुजू तसेच भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (बीसीसीआय) समावेश आहे.

भारतीय भूमि भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकते- वाय.एस. चौधरी

0

नवी दिल्ली : भारतीय भूमि (प्लेट) भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकत आहे. या नैसर्गिकरित्या सरकणाऱ्या प्रक्रियेची नोंद जीपीएसच्या सहाय्याने केली जाते. यासह सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असल्याचे माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तथा पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी दिली.पावसाळी अधिवेशन काळात भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भौगोलिक क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्रालयाने लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतचे स्पष्टीकरण देताना सांगितले, भारतीय प्लेट ही युरेशियन प्लेट्सना घर्षित करते. त्यांच्या या घर्षणामुळे दोन प्लेट्स वरखाली होतात आणि त्यामुळे हिमालय पर्वत रांगेत भूकंप येतो. यामुळेच भारतीय भूमी दरवर्षी 5 से.मी. वायव्यच्या दिशेने सरकत आहे.जमिनीच्या आत होणाऱ्या या भूकंपापासून संरक्षणासाठी भारतीय मानक ब्यूरोने ठरविलेल्या मापदंडाचे पालन करून निर्माणाधीन बांधकामात भूकंप विरोधी रचना करणे तसेच अस्तित्वात असणाऱ्या इमारतींमध्ये रिट्रोफिटिंगचा उपयोग करण्याचे निर्देशित केलेले आहे. त्याप्रमाणे जनसामान्यांमध्ये तसेच भूकंप प्रवण क्षेत्रात भूकंप विरोधी रचनेचा उपयोग करण्याबाबत केंद्रीय पृथ्वी विज्ञान विभागाकडून जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.

भूकंपापासून होणारे नुकसान थांबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यासह सर्व राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सामान्य नागरिकांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम करते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया बळदेखील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती रोखण्याचा प्रयन्त करीत आहे.बाजारात, शाळामध्ये, रुग्णालयात, रेल्वे स्थानक, विमानतळ अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने बचाव केला जावा, यासाठी मॉक ड्रिलव्दारे प्रशिक्षणातून जनजागृती केली जाते.

पतंजली फूड व हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार- मुख्यमंत्री

0
  • 230 एकरात पतंजली फूड पार्क
  • 50 हजारापेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार
  • 5 हजार टनापेक्षा जास्त फळांची प्रक्रिया होणार
  • 5 महिन्यात उत्पादनास सुरुवात
  • विदर्भातील लाखो शेतकरी उपस्थित
  • फूड पार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध

नागपूर,र,:
 मिहानमध्ये होणाऱ्या पतंजली फूड व हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्नप्रक्रिया उद्योगाचा निश्चितपणे फायदा होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मिहानमध्ये पतंजली हर्बल पार्कच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा होते. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनात या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे निश्चितपणे परिवर्तन होईल. कारण उद्योजकांनी येथील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा असे बंधन घातले आहे. जे उद्योजक फूड पार्कसाठी जमीन घेतील त्यांनी तीन वर्षात उद्योग सुरु करावा, अशी अटही त्यात घातली आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियातील मुले व पत्नींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबतही सूचित केले आहे.

पतंजली उद्योगाला जागा देतेवेळी केंद्रीय दक्षता आयोगाच्या निकषानुसार जमीन देण्यात आली आहे. या जागेसाठी तीनवेळा मिहानतर्फे टेंडर काढण्यात आले होते. तिन्हीवेळा पतंजलीने निविदा सादर केली. सर्व नियम व अटीच्या पूर्ततेनंतरच या उद्योगास जागा देण्यात आली आहे. पतंजलीमुळे विदर्भातील 50 हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणावे लागेल. सूक्ष्म सिंचनाला वाव द्यावा लागेल. शेतकऱ्यांचे एक क्लस्टर तयार करावे लागेल. शेतकरी समृद्ध झाला तरच देश व राज्य समृद्ध होईल. विदर्भ व मराठवाड्यात उद्योगांना वाव मिळावा यासाठी शासनाने 4 रुपये 40 पैसे दराने वीज देण्याचे ठरविले आहे. यासाठी वीज वितरण कंपनीला 750 कोटी रुपये शासन देणार आहे. तीन महिन्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात काम असते, यामुळे शेतीला 12 तास वीजपुरवठा तीन महिन्यांसाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सध्या जगात मोठी बाजारपेठ म्हणून फूड प्रक्रिया उद्योगाला वाव आहे. जगातील 700 कोटी लोकसंख्येला अन्न पुरविण्याचे असल्यामुळे या उद्योगास मरण नाही. अमरावती विभागात कापूस ते कापड हे धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार नांदगाव येथे शासनाने सर्व सोयीसुविधा कपडा उद्योगासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला टिकाव धरायचा असेल तर स्वदेशीने दर्जेदार माल दिला तरच हे सर्व शक्य होईल. पतंजलीने मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात जागा घेऊन उत्पादन करण्याचे ठरविले असल्यामुळे नागपुरातून देशातच नव्हे तर जगातही येथील उत्पादन जाईल, ही नागपूरसाठी भूषणावह बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मिहानमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र सोडून फूड पार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध आहे. यासाठी ज्या कंपन्या तयार आहेत त्यांना दरवर्षी दोन हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण, 100 कोटी रुपयाचा माल विदर्भातून खरेदी करणे, तसेच एक वर्षात गुंतवणूक करावी लागेल. जमीन वाटपात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. यासाठी चार सचिवाची एक समिती नेमण्यात आली आहे. या सचिवांच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योगाला जमीन देताना सर्व निकषांची माहिती देण्यात येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकरी माल विकताना मध्यस्थांच्या शोषणाचे बळी ठरतात. शेतकऱ्यांच्या बाजारावर नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. हे थांबविण्यासाठी तसेच मध्यस्थांना हटविण्यासाठी थेट शेतकरी उद्योगाशी जोडल्या जातील, अशी व्यवस्था निर्माण करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

श्री.गडकरी म्हणाले, पतंजली फूड व हर्बल पार्क कारखाना विदर्भात सुरु होणे हा सुवर्णक्षण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्या दिशेने केलेला हा मोठा प्रयत्न आहे. विदर्भात 75 टक्के वनक्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणात वनोषधी सुद्धा आहे. मेळघाटसारख्या भागामध्ये आयुर्वेद वनस्पती उपलब्ध आहेत. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी जागेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात मिहानमध्ये जगातील मोठ्या आयटी कंपन्या येतील. त्या दिशेने प्रयत्न सुरु असून तसे करारही होत आहेत. भद्रावतीत कोळश्यापासून युरिया बनविण्याचा कारखाना लवकरच उभारण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के किंमतीत युरिया उपलब्ध होईल.

सुरुवातीला आचार्य बाळकृष्ण यांनी प्रास्ताविक केले. एसईझेडमध्ये जागा खरेदीचा 10 कोटी रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना दिला. पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोपटे देऊन केले.

यावेळी खासदार सर्वश्री कृपाल तुमाने, रामदास तडस, अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री आशिष देशमुख, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, अनिल सोले, गिरीष व्यास, समीर मेघे, रवी राणा, पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, डॉ.राजीव पोद्दार, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मिहानचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, डॉ.जयदीप आर्य, यशपाल आर्य प्रामुख्याने उपस्थित होते.

गुजरातचा राडाः मोदींनीआनंदीबेन पटेलांना दिल्लीत बोलाविले

0

नवीदिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शहा यांची गुरूवारी सुरतमध्ये आयोजित सभा उधळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून नुकत्याच पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले.  या आदेशानंतर आनंदीबेन पटेल खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून  बाहेर आली आहे.

आनंदीबेन पटेल यांना महिन्याभरापूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आपला उत्तराधिकारी म्हणून नितीन पटेल यांना डावलल्याने आनंदीबेन नाराज झाल्या होत्या. अमित शहा यांनी नितीन पटेल यांना डावलत स्वत:च्या मर्जीतील विजय रुपानी यांना मुख्यमंत्री बनवले होते. मुख्यमंत्री निवडीसाठी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीतही अमितभाई व आनंदीबेन यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यामुळे अमित शहा आणि आनंदीबेन पटेल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.  या पार्श्वभूमीवर काल सुरतमध्ये अमित शहांची उधळण्यात आल्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

अधिकार को लेकर आदिवासी विद्यार्थियों का आंदोलन

0

छात्रावास मे विद्यार्थियों से शैक्षणिक खिलवाड़
berartimes.com,गोंदिया –एकात्मिक आदिवासी विभाग की ओर से गोंदिया में छात्र-छात्राओं की ४ छात्रावास शुरू है। लेकिन इन छात्रावासों में शिक्षा का पाठ पढऩेवाले आदिवासी विद्यार्थियों के साथ शासन के अधिकारी ही अधिकार छिनकर शैक्षणिक खिलवाड़ कर रहे हैं। अपना हक पाने के लिए आदिवासी विद्यार्थियों ने ९ सितंबर को विभिन्न मांगों को लेकर छात्रावास क्रमांक २ के सामने ही ठिय्या आंदोलन शुरू कर दिया है। मांग है कि जब तक प्रकल्प अधिकारी आंदोलन स्थल पर नहीं आते एवं समस्या नहीं सुलझाते तब तक आंदोलन जारी रहेगा। इस तरह की भूमिका छात्रों द्वारा अपनाने से प्रशासन भी सख्ते में आ गया है। आंदोलन में सैकड़ों की संख्या में छात्र-छात्राएं शामिल थे। 

यह बता दें कि एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी के नियंत्रण में गोंदिया में ४ छात्र-छात्राओं के छात्रावास चलाए जा रहे हैं। लेकिन भौतिक सुविधा उपलब्ध नहीं होने से विद्यार्थी मानसिक, शारीरिक रूप से परेशान हो गए हैं। बताया गया है कि छात्रावास क्रमांक २ में ८० छात्रों की क्षमता है। शैक्षणिक  सत्र शुरू होने के बावजूद भी विद्यार्थियों को छात्रावास में प्रवेश नहीं दिया गया है। ८० छात्रों के लिए ६ कमरे तथा एक ही शौचालय एवं स्नानगृह है। मजबुरन उन्हें खुले में शौच एवं स्नान के लिए जाना पड़ रहा है। विद्यार्थी अधिक और सुविधा कम होने से फर्श पर ही विद्यार्थियों को सोना पड़ रहा है। सफाई का अभाव होने से पुरा छात्रावास का वातावरण दुर्गंधयुक्त बन गया है। जिससे छात्रों का स्वास्थ्य खतरे में आ गया है। शैक्षणिक सत्र शुरू होने को २ माह बित चुके हैं लेकिन अभी तक प्रशासन ने शैक्षणिक सामग्री वितरित नहीं की है। जिससे उनका शैक्षणिक नुकसान हो रहा है। छात्रावास के गृहपाल तथा सफाई कर्मचारी द्वारा असभ्य व्यवहार कर मानसिक यातनाएं दी जा रही है। इसलिए गृहपाल एवं सफाई कर्मचारी का स्थानांतरण करें, इमारत छोटी होने से नई इमारत में छात्रों का छात्रावास शुरू करें, प्रतिक्षित सूची में शामिल विद्यार्थियों को प्रवेश नहीं दिए जाने से उन पर शिक्षा से वंचित रहने की बारी आ चुकी है। इस संदर्भ में अनेकों बार विद्यार्थियों द्वारा वरिष्ठ अधिकारियों को अवगत कराया गया। लेकिन इस ओर वे ध्यान देने की बजाय समस्या को बढ़ाने का कार्य कर रहे हैं। आखिरकार परेशान होकर ९ सितंबर से छात्रावास क्रमांक २ के सामने चारो छात्रावास के छात्र-छात्राओं ने अपनी विभिन्न मांगों को लेकर ठिय्या आंदोलन शुरू कर दिया है। जिससे प्रशासन सख्ते में आ गया है। 


८० विद्यार्थी बाथरूम एक
आदिवासी विद्यार्थियों के कितना खिलवाड़ किया जाता है। इसका प्रत्यक्ष उदाहरण देखा जाए तो छात्रावास क्रमांक २ में जाकर देखा जा सकता है। २ मंजली इमारत में स्थित ६ कमरे एवं २ हॉल में ८० विद्यार्थी निवास करते हैं। इन ८० विद्यार्थियों के लिए सिर्फ १ ही शौचालय एवं स्नानगृह है। इसका उपयोग करने में कठिनाई होने से छात्र रात ३ बजे से ही जाग जाते हैं। इस तरह की गंभीर समस्या का सामना यहां के विद्यार्थियों को करना पड़ रहा है। 


समस्या को सुलझाएंगे
आंदोलन की जानकारी मिलते ही आंदोलन स्थल पर अधिकारी को लेकर पहुंचे। उनकी समस्या से अवगत होकर ध्यान में आया कि समस्या गंभीर है। उपरोक्त समस्या जल्द ही सुलझाने का प्रयास किया जाएगा। जिसकी जानकारी प्रकल्प अधिकारी को प्रेषित की गई है। वहीं १५ सितंबर तक छात्रावासों में विद्यार्थियों को प्रवेश देने की प्रक्रिया पूरी की जाएगी। 
पी.एम. खंडारे, सहायक प्रकल्प अधिकारी, देवरी

कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ

0

सीआयडी चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी


भंडारा, (दि.१०) -कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय झाल्याचे लक्षात येते. राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परीक्षा ६ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी  दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आला.
परंतु, सदर निवड प्रक्रियेमध्ये पुढीलप्रमाणे घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्रमांक १३६६४, बैठक क्रमांक ५१२७१४६३९६) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातुन (अर्ज क्रमांक ४८१७, बैठक क्रमांक १५२११०९०२०) OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – ९ मध्ये झाली.  पुणे विभागातून हरीश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे  भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावांना १८३ गुण प्राप्त झाले. विशेष म्हणजे या दोन भावांच्या वयात केवळ ६ महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी,१८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी. कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी.
अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परीक्षार्थी आहेत. मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणांवर झाली. यांच्या तुलनेत OBC महिला यादी ११३ व OBC पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. OBC उमेदवारांना जास्त गुण असूनसुद्धा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुद्धा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरूप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करीता सदर विद्यार्थ्यांची परीक्षाकेंद्रावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्यात यावी जेणेकरून कुणी यांना मदत तर करीत  किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सादर प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी व त्यात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुद्धा नोंदविण्यात यावे अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, धर्मेंद्र गणवीर, पृथ्वी तांडेकर, नगर अध्यक्ष सचिन घनमारे, डॉ. विनोद भोयर, प्रसन्न चकोले, अजय गडकरी, मनोज बागडे,  इम्रान पटेल, दिलीप देशमुख, कोमल कळंबे, मुकुंद साखरकर, मोहीस कुरेशी, पराग भुतांगे, शीतल भुरे, राहुल शामकुवर,सतीश वैरागडे, गीता रेहपाडे, यांनी केली.

वसतिगृहातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

0

गोंदिया- एकात्मिक आदिवासी विभागाच्या वतीने गोंदिया येथे सुरू असलेल्या चारही वसतिगृहातील अनागोंदी कारभाराविरुद्ध स्थानिक वसतिगृह क्र.२ समोर काल पासून विद्याथ्र्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सविस्तर असे की, देवरीच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत गोंदिया येथे चार वसतिगृह सुरू आहेत. परंतु, या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. येथील वसतिगृह क्र. २ मध्ये एकूण ८० विद्यार्थी क्षमता असताना आदिवासी विद्यार्थ्यांना येथे प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले. या वसतिगृहात ६ खोल्या आणि केवळ एका स्वच्छतागृहाची सोय आहे. परिणामी, आपल्या दैनंदिन क्रिया आटोपण्यासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते. झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना खाली झोपावे लागते. याशिवाय वसतिगृह अस्वच्छतेने कळस गाठला असून विद्याथ्र्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शैक्षणिक सत्राची सुरवात होऊन २ महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने अद्यापही शैक्षणिक साहित्याचे वाटप केले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वॉर्डन व सफाई कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचाा छळ केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करणे, प्रतीक्षा यादीतील विद्याथ्र्यांना वसतिगृहात प्रवेश देणे, नवीन वसतिगृह सुरू करणे या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही विद्यार्थ्य्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

समस्यांचे निराकरण केले जाईल- पी. एम. खंडारे

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच देवरीचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी पी. एम. खंडारे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची घटनास्थळी जाऊन विचारपूस केली. त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत श्री खंडारे यांनी या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. येत्या १५ सप्टेंबर पूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

चालकाला मोबाईलवर बोलणे भोवलेः 11 प्रवाश्यांचा मृत्यू

0

अंगूल- मोबाईलवर बोलणा-या बसचालकाचे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना ओडिशात घडली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
ओडिशामधील महाराजा ट्रॅव्हल्सची खासगी बस अंगूल जिल्ह्यातील अथामलिककडून बाँधकडे जाण्यासाठी निघाली होती. जुन्या मानिंत्री पुलाजवळ बस आली असता बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून ५० फुट खाली कोसळली. यात १४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ७ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमींना अंगूल आणि कटकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाँधपासून ४० किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला.

दप्तरविरहित उपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकाऱ्यांचे आईवडील

0

खेमेंद्र कटरे berartimes.com
गोंदिया,दि.८ : विविध शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात नावलौकीक मिळविलेल्या गोंदिया जिल्ह्याने आज ८ सप्टेबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिन साजरा करुन वाचनाचा आनंद अनुभवला. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमधूनच वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. या पुस्तकामध्ये थोर पुरुषांचे जीवनचरित्र, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना दप्तरविरहित दिनामुळे सुट्टी देण्यात आली असली तरी आजचा दिवस पदमपूरवासियांसाठी मात्र एक वेगळी पर्वणी देणारा ठरला.ते असे की,जिल्ह्याचे उपक्रमशील व लोकाभिमुख जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याच संकल्पनेतून जो दप्तरविरहित दिवस आज जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याउपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकारी साहेबांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी आणि आई सुशिलाबाई सूर्यवंशी.ते नुसते सहभागीच झाले नाही,तर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सवांद साधत आपले बालपणाच्या आठवणींना वाट मोकळी करुन दिली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आईवडील देखील या दप्तरविरहित दिनाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती तर अनेकांना प्रेरणादायी ठरली. नामदेवराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आई सुशिलाबाई हया राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापीका आहेत.त्यामुळे दोघांचेही मन शाळेतील विद्यार्थांत असे रमले की,आई सुशिलाबाईंना तर त्यांच्या शाळेतील विद्यार्थांचे चेहरे पदमपूरच्या विद्यार्थांना बघून आठवू लागल्याचे त्यांच्या चेहर्यावरील हावभावावरुन दिसत होते.त्यांनी मनमोकळपणाने विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.तेव्हा विद्यार्थांनाही आपण कुणा अधिकार्याच्या आईवडीलासोंबत सवांद साधत असल्याचे नव्हे तर आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी सवांद साधत असल्याची अनुभूती वाटली.
शालेय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध वैचारीक स्वरुपातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचारसरणी तयार व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांसोबतच गावात व शेजारच्या गावात असलेल्या सार्वजनिक वाचनालयातून वाचन आनंद दिवसासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचानाची आवड निर्माण होऊन वाचन चळवळ भक्कम करण्यासाठी दप्तरविरहित दिवस उपयुक्त ठरल्याचा अांनद बघावयास मिळाला.unnamed-5
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना पदमपूर गावाचे वैशिष्ट्य विचारले. महाकवी भवभूतीचा इतिहास सुध्दा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला. कोणकोणती पुस्तके वाचता, शाळा सुटल्यानंतर काय करता, सकाळी किती वाजता उठता, कोणाच्या घरी शौचालय नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. फुटबॉलपटू रोनाल्डो, मेसी, ऑलिम्पीक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची माहिती, संत पद मिळालेल्या मदर टेरेसा यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.याचवेळी एका विद्यार्थांने जिल्हाधिकारी पदावर जाण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली असा प्रश्न बिनधास्त विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनीही आईवडील हे सांगताच आईवडील हे प्रेरणादायी आणि पहिले गुरु असतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.

नीती आयोग गांगरले; आरबीआयचे गर्व्हनर समजून स्वागत केले भलत्याचेच

0

नवीदिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनर पदावरून रघुराम राजन पायउतार झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पदभार घेतला आहे. पटेल हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच साधेपणामुळे नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आणि दुसऱ्याच व्यक्तीला उर्जित पटेल समजून त्यांचे त्याचे ‘स्वागत’ केले. उशिराने त्यांना आपली चूक लक्षात आली. झालं असं की, मंगळवारी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या २४ व्या गर्व्हनरपदाची धुरा आपल्या हाती घेतली. पदभार घेतल्यानंतर त्यांची पहिलीच बैठक ही नीती आयोगाबरोबर होती. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला.
पटेल यांची नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्याबरोबर मंगळवारी सांयकाळी बैठक होती. नीती आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पटेल यांच्या स्वागताची तयारी केली होती. आयोगाचे एक वरिष्ठ अधिकारी पटेल यांची वाट पाहत प्रवेशद्वारावर थांबले होते. पटेल यांच्या आगमनावेळीच एक महागडी कार कार्यालयासमोर आली. संबंधित अधिकाऱ्याला कारमधील व्यक्ती उर्जित पटेल असल्याचे वाटले. त्यांनी लगेचच पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना कार्यालयाकडे नेले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला आपल्या हातून चूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता.
त्याचदरम्यान उर्जित पटेल हेही आपल्या कारने नीती आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्या हातात फाईलींचा गठठा होता. प्रवेशद्वारावर केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या जवानाने त्यांना ओळखले नाही. त्याने लगेच पटेल यांना अडवले व ओळखपत्राची मागणी केली. पटेल यांनी लगेचच त्याला ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र पाहिल्यानंतरच जवानाने पटेल यांना आत जाऊ दिले.