राष्ट्रीय पोषाहार सप्ताह
गोंदिया,दि.२ : व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती महिलेला योग्य पोषाहार वेळेत मिळाला तर त्यांचे आरोग्य निश्चित चांगले राहील. असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी व्यक्त केले.
१ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे उदघाटक म्हणून डॉ.केवलीया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, मेट्रन निरंजन फुलझेले यांची उपस्थिती होती.
डॉ.केवलीया पुढे म्हणाले, कशाप्रकारे आहार घ्यावा याबाबत काही पध्दती आहेत. काही पध्दतीबाबत भ्रम सुध्दा आहेत. आहार तज्ज्ञांनी जनमाणसामध्ये पोषाहाराबाबत असलेला गैरसमज दूर करण्याचे काम करावे.डॉ.पातुरकर म्हणाले, आपण काय खातो, कसे खातो, किती खातो हे आहारात महत्वाचे आहे. मानवी आहारात जीवनसत्व, धातू, खनीजे यांचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेतला पाहिजे. किती खावे याची सुध्दा मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
१ ते ७ सप्टेबर दरम्यान चालणाऱ्या पोषाहार सप्ताहनिमीत्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी विनय पटले, एकता मोगरे, योगेश वलथरे व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार आहारतज्ज्ञ शिल्पा आंबेकर यांनी मानले.
पोषाहाराचे महत्व सर्वसामान्यांना कळावे- अधिष्ठाता डॉ.केवलीया
स्वच्छता अभियानात सामाजिक संस्थांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि.2 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून
महाराष्ट्राला संपूर्ण स्वच्छतेकडे नेण्यासाठी सामाजिक संस्थांचे
महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केले.
जायंट इंटरनॅशनल, शायना एन.सी. व नाना चुडासामा यांच्या
संस्थेमार्फत येथील पोलीस आयुक्त कार्यालयास पुरविण्यात आलेल्या
शौचालयांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता,
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन
मंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर,
शायना एन. सी., अभिनेत्री रविना टंडन, आदर पुनावाला आदी उपस्थित होते.
नागपूरकरांनी काढले शोभा डे आणि मल्ल्यांचे वाभाडे
नागपूर – तब्बल 135 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारा मारबत उत्सव आज (शुक्रवार) शहरात धूमधडक्यात साजरा झाला. या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात राग आणि संताप व्यक्त होत होता. दरम्यान, विजय माल्ल्या आणि लेखिका शोभा डे यांचे काढलेले वाभाडे हेच यंदाच्या मारतबतीचे खास वैशिष्ट्य ठरले.
बडग्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती, लालगंज खैरीपुरा येथील युवाशक्ती बडग्या उत्सव समिती यांच्या प्रतिमा लक्षवेधी ठरल्या.’मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पूर्वी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणूक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.
काळी आणि पिवळी मारबत
यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवर्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याची मिरवणूक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला ‘बडग्या’ म्हणतात. या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी) नागपूर व जवळपासच्या गाव – खेड्यातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेऊन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. यंदा काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला 135 वर्षे तर पिवळ्या मारबतीला 132 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पक्षातील लोकांनीच घात केला – एकनाथ खडसे
जळगाव,दि.2- भारतीय जनता पक्ष हा कधीच एका जातीचा किंवा धर्माचा पक्ष म्हणून उभा केला नाही. गेली 40 वर्ष झटून हा पक्ष उभा केला. त्या पक्षाची बदनामी नको म्हणून राजीनामा दिला, असे सांगत 62 वा वाढदिवस साजरा करताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांनी घात केल्याचा टोला पक्षातील विरोधकांना लगावला. मुक्ताईनगरमधील कोथळी या खडसेंच्या मुळ गावी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या जाहीर कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.जाहीर सभेआधी उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्रीपद गेल्यानंतर खडसेंचे हे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
दाऊदच्या पाकिस्तानातील घरी फोन, जावयाची लॅम्बॉर्गिनी कार, भोसरीतील भूखंड, कारखान्यासाठी हजारो एकर जमीन लाटल्याच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे ठासून सांगत एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांशी लढलो असतो पण स्वपक्षीयांनीच घात केला.राजीनाम्याचे शल्य खडसेंनी यावेळी बोलून दाखविले. कोणत्या पक्षात गेले पाहिजे हे ही न कळणाऱ्या वयात तत्कालीन जनता पार्टी आणि आजच्या भारतीय जनता पक्षाची कास धरली. 40 वर्षांपूर्वी हा पक्ष राजाभाऊ आणि मी जिल्ह्यात, गावागावत फिरून उभा केला, असे खडसेंनी सांगितले.
मंत्रीपद गेल्यानंतरही खडसेंच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले नाही. याचे रहस्य सांगताना त्यांनी एक हिंदी शायरीचा आधार घेत म्हटले, ये मुस्कूराती जिंदगी जिंदादिली का नाम है…
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
मुंबई, दि. 1 – ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी नानावटी रूग्णालयात वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरमुळे आजारी होते. या जीवघेण्या आजारासोबतची त्यांची लढाई अखेर आज अयशस्वी ठरली.
कामगार क्षेत्रात अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व राव करत होते. महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व करताना हजारो आंदोलने राव यांनी केली आहे. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतरचे एकमेव लढवय्ये नेतृत्त्व म्हणून राव यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने उभे कामगार विश्व पोरके झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
काळी पिवळीच्या भीषण अपघातात तीन ठार पाच जखमी
बुलढाणा दि. 1-समोरून येणाऱ्या बसला कट मारून भरधाव काळी पिवळी रोडच्या कडेला जाऊन पालटली. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले व पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहे. ही दुर्घटना गुरुवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास चिखली रोडवरील मुंगसरी फाट्यानजीक घडली.काळी पिवळी क्र. एमएच-२८-२२०५ ही प्रवासी घेऊन मेहकर वरून चिखलीकडे भरधाव वेगात निघाली होती. समोरून येणारी बस क्र. एमएच-४०-९५७९ ला कट मारून काळी पिवळी रोडच्या कडेला असलेल्या आडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, काळी पिवळी मधील फिरोज शेख, जब्बार शेख, शिवाजी उत्तम देशमुख व गणेश माधव काकडे हे तिघे जागीच ठार झाले. तर पाच प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाता प्रकरणी एस.टी. बस चालक प्रदीप जाधव (वय ४२) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी काळी पिवळी चालक अब्दुल इमीद अब्दुल कादर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवयवदानामुळे दुसऱ्यांना जीवन जगण्याची संधी – डॉ.विजय सूर्यवंशी
अवयवदान अभियानाचा समारोप
गोंदिया,दि.१ : मानवाला डोळे, यकृत, हृदय व मुत्रपिंड यासारख्या अवयवांची दिलेली अवयवरुपी भेट ही मृत्यूनंतरही दुसऱ्या गरजू रुग्णांना दान करता येवू शकते व मृत्यूच्या क्षणावर असलेल्या रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आज १ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे महाअवयवदान अभियानाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, प्रा.डॉ.व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन, जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी राज्यात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरावे परी अवयवदानारुपी उरावे असेच म्हणावे लागेल. मृत्यूनंतर आपल्या शरीरावर आपला काहीच अधिकार राहत नाही, तो मातीमोल असतो. परंतू अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतरही एका नवीन व्यक्तीला जीवनदान देवू शकतो असेही त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा निसर्गसंपन्न असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात वनसंपदा व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपल्या कारकिर्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले याचा आपल्याला अभिमान असून या महाविद्यालयाचे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.अजय केवलीया व डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी शासनाकडून महा अवयवदान अभियान राबविण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली व त्याचे महत्व पटवून दिले व मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयवदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अवयवदान महान कार्य या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन व श्री.जैन यांनी मार्गदर्शन केले. महा अवयवदान निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल, मनोहर म्युन्सीपल हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनियर कॉलेज, डी.बी.सायंस कॉलेज, एस.एस.ए.एम.गर्ल्स हायस्कूल व श्रीमती सरस्वतीबाई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला डॉ.सुरेखा मेश्राम, डॉ.तोटे, डॉ.श्रीखंडे, डॉ.जयस्वाल, यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.संगीता भलावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रवीण जाधव यांनी मानले.
रिलायन्स जिओने लाँच केली 4G सेवा, 50 रुपयात 1GB डाटा
मुंबई, दि. 1 – रिलायन्सने बहुप्रतिक्षित जिओ 4G सेवेचं लाँचिंग केलं आहे. मुंबईतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जिओ 4G सेवा लाँच केली. मुकेश अंबानी यांनी 4G सेवेचं लाँचिंग करताना ग्राहकांसाठी खुशखबरही दिली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी यावेळी केली.
5 सप्टेंबरपासून जिओचं सिमकार्ड उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना संपुर्ण देशभरात रोमिंग सेवेसहित एसटीडी, लोकल कॉलिंग सेवाही मोफत मिळणार आहे. सिमकार्डवर 50 रुपयांमध्ये एक जीबी डाटा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त 25 टक्के मोफत डाटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 18 हजार शहरं आणि 2 लाख गावांमध्ये ही सेवा पोहोचवण्यात येणार असून 4G मुळे नव्या डिजिटल युगाची सुरुवात होत असल्याचं मुकेश अंबानी बोलले आहेत.
सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.
जिओ सिमकार्ड मिळवायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर आलेल्या सुचनांना फॉलो केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरमध्ये गेल्यास सिमकार्ड उपलब्ध होईल.
एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली, दि.१:राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील ८ ते १० वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बाद करण्याच्या हालचाली शासनाने सुरु केल्याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली व्यथा सांगितली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु झाल्यानंतर राज्यात १८ हजार, तर जिल्ह्यात ७५० कर्मचारी मागील ८ ते १० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहायक, लेखापाल, तालुका समूह संघटक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचव्ही, एएनएम, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या कामाची रुपरेषा नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच असून, त्यानुसारच ते काम करीत आहेत. या सर्वांची नियुक्ती सरळसेवा भरतीच्या मानांकनानुसार झाली असल्याने त्यांच्या अनुभवाचा विचार करुन सर्वांना शासन सेवेत रिक्त असलेल्या समकक्ष पदावर विनाशर्त सामावून घेण्याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शिवाय वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने एनआरएचएममधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २४ ते ३१ ऑगस्टपर्यंत काळी फित आंदोलन केले. परंतु शासनाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सुप्रसिद्ध वर्हाड़ी कवी श्री शंकर बड़े यांचे निधन
यवतमाळ -प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब उर्फ शंकर बडे यांचा उपचारा दरम्यान संजीवनी रुग्णालयात दुख:द निधन झाले. त्यांचे वय ६९ वर्ष हाेते. त्यांच्यामागे पत्नी काैसल्या मुली भारती, निता, किर्ती व मुलगा गजानन बराच माेठा आप्त परीवार आहे. आज १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता पेशवे प्लॉट येथील त्यांच्या निवासस्थाना वरुन अंत्ययात्रा निघेल. ऑर्केस्ट्रामधून संचलन आणि वऱ्हाडी बाेलीतुन कवितांचे तसेच वऱ्हाडी व्यक्तीचित्रांचे साभिनय सादरीकरण बेरिस्टर गुलब्याचे हजाराे प्रयाेग राज्यात त्यांनी सादर करुन प्रचंड लाेकप्रीयता मिळविली हाेती. विदर्भ साहित्य संघ संमेलनाचे आर्णी येथे ते अध्यक्ष हाेते. त्यांचे ईरवा सगुण मुकुट हे तीन काव्यसंग्रह प्रसिधद असुन दै सकाळ मधील धापाधुपी हे सदर वाचकप्रीय ठरले. त्या लेख संग्रहाचे पुस्तक येऊ घातले हाेते. मतदान करण्याच्या शासकीय माेहिमेचे ते ब्रांड एम्बासिडर हाेते.