28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गावकर्‍यांचा आमदार काशिवार यांना घेराव

गावकर्‍यांचा आमदार काशिवार यांना घेराव

0
34

साकोली ,दि.२७: साकोली तालुक्यातील पळसगाव (सोनक) येथे रविवारी झालेल्या आंदोलनाप्रसंगी पळसगाव ते बोळांदे रस्ता सालई या रस्त्याच्या भूमिपूजनाकरिता आलेले आमदार बाळा काशिवार यांच्यावर गावकर्‍यांनी शेतकर्‍यांच्या समस्या व विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, याकरिता आमदाराला घेराव घालून त्यांना समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर बसवून ठेवले.
साकोली तालुक्यातील पळसगाव, गोंडउमरी, महालगाव, सुकळी, वडद, वांगी, चिंगी, सोनका, चिचटोला, निलज येथील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येऊन विजेचा प्रश्न सोडविण्यात रास्ता रोको आंदोलन केले.शेतकर्‍यांना नियमित वीजपुरवठा देण्यात यावा, याकरिता साकोली येथे उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणकर्त्यांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष होत असल्याने गावकर्‍यांनी रस्ता रोखून धरला होता.

blank