26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक पालकदिनानिमित्त प्रोग्रेसिव्हमध्ये कला प्रदर्शन

पालकदिनानिमित्त प्रोग्रेसिव्हमध्ये कला प्रदर्शन

0
28

गोंदिया,दि.09ः-पालकदिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रदर्शनाने उपस्थित पाहुणे व पालकांचे मन जिंकले.
ग्राहक फोरमचे अध्यक्ष भास्कर योगी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने डॉ. सायस केंद्रे, डॉ रोशन कानतोडे, अश्‍विनी केंद्रे, अंजना योगी, अंजू पटले, संस्थाध्यक्ष डॉ पंकज कटकवार, अल्का कटकवार, सचिव नीरज कटकवार, पद्मा कटकवार, प्राचार्य ओ टी रहांगडाले, वाय आशा राव आदी उपस्थित होते. या प्रसंगी विविध नृत्य प्रकार सादर करून विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या कलागुणांची भेट दिली. उपस्थितांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
आयोजनासाठी कुमुदिनी तावाडे, मीनाक्षी महापात्रा, रेहाना शेख, प्रमोद वाडी, विकास पटले, राहुल रामटेके, राफिया कुरेशी, महेंद्र हरिनखेडे, योगिता शेंडे, र्शुती केकत, ममता मेश्राम, प्रियंका बोरकर, जयश्री खंगार, भारती गाढवे यांनी परिश्रम घेतले.