रेल्वेमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या मोबाईल चोरास मोबाईल व इतर साहित्यासह अटक

0
22

गोंदिया- नंगपुरा मुर्री ग्रामपंचायत कार्यालय परिसरात संशयास्पदरित्या वावरणार्‍या इसमाला 13 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून 46,600 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. नंगपुरा मुर्री येथे रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला मोहित जितेंद्र मेश्राम (29) हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर संशयितरित्या फिरताना आढळला.पोलिसांनी त्याची झडती घेतली असता एका बॅगमध्ये धातुची पिवळ्या रंगाची मूर्ती व सात मोबाईल संच असा एकूण 46,600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतले.दरम्यान त्याने तीन मोबाईल, धातुची पिवळ्या रंगाची मुर्ती व राखडी रंगाची लेडीज बॅग ही नागपुर- गोंदिया रेल्वेगाडीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, यांचे निर्देशांन्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे व गोंदिया शहर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सागर पाटील, यांचे नेतृत्वात पोहवा. जागेश्वर उईके ब.न. १९२०, पोहवा. सुदेश टेंभरे ब. न. ५९६, पोहवा . प्रमोद चव्हाण ब.न. ४४८, पोहवा. बिसेन ब.न. १४०२, पोशि. कुणाल बारेवार ब.न. २२४३, पोशि. मुकेश रावते ब.न. ११३५, पोशि. पुरूषोत्तम देशमुख ब.न. १८५४, पोशि. दिनेश बिसेन ब.न. १२९३ यांनी केलेली आहे.