हातभट्टी दारू अड्डय़ावर पोलिसांची धाड

0
24

गोंदिया-गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत जुनेवानी जंगलशिवारात सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड कारवाई केली. दरम्यान घटना स्थळावरून ३५ हजार ७00 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सविस्तर असे की, जिल्ह्यात अवैधरित्या आजही ग्रामीण भागात मोहफूलच्या माध्यमातून हातभट्टी दारू तयार करून विक्री करण्यात येते. पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत असली तरी, हा प्रकार आजही राजरोसपणे सुरू आहे. त्यातच गंगाझरी पोलिस ठाणे हद्दीतील जुनेवानी हद्दीतील जंगलशिवारात अवैधरित्या मोहफुलाची दारू गाळली जात आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर १२ नोव्हेंबर रोजी अवैध दारू भट्टीवर छापामार कारवाई करण्यात आली. दरम्यान घटनास्थळावरून एका आरोपींसह ३५ हजार ७00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धनराज बुधराम बरईकर (५८) रा.गंगाझरी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा महेंद्र कटरे, जितेंद्र बघेल यांनी केली.